Amravati Crime: महिला पोलिसाची घरात घुसून हत्या, अमरावतीत खळबळ

अमरावती: अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इथे एका महिला पोलिसाची तिच्या घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. अशा घुले असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत ३८ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी आशा घुले यांची गळा दाबून हत्या करण्यात  आली आहे. आशा घुले या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. तर त्यांचे पती एसआरपीएफमध्ये कर्मचारी आहेत. या हत्येचा तपास सुरू असून डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून संशयितांवर नजर ठेवली जात आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. कारण  जिथे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्याच घरी गळा दाबून हत्या केली जाते, तर तेथील सामान्य लोकं किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
Comments
Add Comment

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची

प्रकाश आंबेडकरांच्या तंबीनंतर काँग्रेस ताळ्यावर !

मुंबई : मी ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यादिवशी काँग्रेसला महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात फटका बसेल, अशी तंबी प्रकाश

भाजप मुंबईत ३० टक्के नवे चेहरे देणार ?

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर ‘एबी’ फॉर्मचे वाटप होणार मुंबई : राजकारणात प्रयोगशील पक्ष अशी ओळख असलेली

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात