यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार, शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच

ठाणे : शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात शिउबाठाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना मंत्री संजय राठोड उपस्थित होते. लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील विविध पक्षांचे १० हजार कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अडीच वर्ष महायुतीचा मुख्यमंत्री असताना राज्यात विकासाची कामे केली. लाडकी बहिण, लाडके भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचे काम सरकारने केले. या कामाची पोचपावती म्हणून विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले. लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीचा चारी मुंड्या चीत केले. ज्यांना सत्तेत येण्याची स्वप्न पडत होती, ती धुळीस मिळाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. महायुती वेगाने काम करत आहेत. त्यामुळेच शिउबाठा, काँग्रेस आणि इतर पक्षातील शेकडो लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना दिलेला शब्द पाळते म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेवर विश्वास ठेवून येत आहेत, असे ते म्हणाले. शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना यवतमाळमधील पदाधिकारी पक्ष प्रवेशासाठी ठाण्यात एक दिवस मुक्कामी राहिले, याबाबत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले.

शिवसेनेत नेर नगरपालिकेचे शिउबाठाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी नगराध्यक्ष सुनीता जयस्वाल, माजी नगराध्यक्ष वनिता मिसळे, नगरसेवक संदीप गायकवाड, दिलीप म्हस्के, साजिद शरिफ, नगरसेविका सरिता सुने, नगरसेविका दर्शना इंगोले, शिउबाठाचे अल्पसंख्याक आघाडीमा माजी जिल्हाध्यक्ष रिझवान खान, गणेश शीलकावार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य राकेश नेमनवार, पंचायत समिती उपसभापती संतोष बोडेवार, माजी सभापती अभय डोंगरे, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलास ठाकरे, संचालक राहुल देहणकर, उबाठाचे महागाव शहर समन्वयक अविनाश देशमुख, भाजपचे पदाधिकारी तेजस ठाकरे, शिउबाठाचे सवनाचे पदाधिकारी रुपेश ठाकरे, अमोल जाधव, शुभम राठोड, निलेश भारती या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

पश्चिम विदर्भातील १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत

पश्चिम विदर्भातील १० हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेते पक्ष प्रवेश करणार आहेत. यवतमाळमध्ये पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून विदर्भातील किमान १० हजार कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे मंत्री राठोड यांनी सांगितले.
Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय