पगार १५ हजार रुपये पण २४ घरं, ४ प्लॉट, ४ कार अशी ३० कोटींची मालमत्ता

कोप्पल : कर्नाटकमधील कोप्पल येथे राहणाऱ्या एका माजी लिपिकाच्या घरातून लोकायुक्तांनी ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली. आरोपी माजी लिपिकाचे नाव कलाकप्पा निदागुंडी आहे. आरोपी लिपिकाच्या घरातून लोकायुक्तांनी २४ घरे, ४ भूखंड, ४० एकर शेती जमीन, ३५० ग्रॅम सोने, १.५ किलो चांदी आणि चार वाहने अशी ३० कोटी रुपयांची मलमत्ता जप्त केली.

दरमहा १५ हजार रुपये पगार घेणाऱ्या कलाकप्पा निदागुंडीने ३० कोटी रुपयांची मालमत्ता उभारली. यातील काही मालमत्ता कलाकप्पा निदागुंडीच्या नावावर तर काही त्याच्या पत्नीच्या नावावर असल्याचे लोकायुक्तांच्या प्राथमिक तपासात आढळले.

कलाकप्पा निदागुंडी विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार आली होती. कोप्पळचे आमदार के. राघवेंद्र हितनल यांनी या प्रकरणात तपास होईल असे आश्वासन दिले होते. यानंतर लोकायुक्तांच्या मार्गदर्शनात कलाकप्पा निदागुंडीच्या घरावर धाड पडली होती. कलाकप्पा निदागुंडी आणि माजी केआरआयडीएल अभियंता झेड.एम. चिंचोलकर यांनी ९६ अपूर्ण प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून ७२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे. य प्रकरणात झालेल्या जप्तीमुळे कलाकप्पा निदागुंडीच्या अडचणी वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत