गोकुळाष्टमी निमित्त राज्यातील १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण

  70

मुंबई : गोकुळाष्टमी अर्थात दहिहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अत्यंत महत्त्वाचा सण असून या उत्सवात राज्यातील हजारोात युवक-युवती "गोविंदा" म्हणून थरावर थर रचत हंडी फोडण्यासाठी सहभागी होतात. मात्र गेल्या काही वर्षांत सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी अनेक अपघात घडले असून, अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विमा संरक्षण मिळावे म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यंदा राज्यातील सुमारे १.५० लाख गोविंदांना "गोविंदा समन्वय समिती (महा.)" या नियोजन समितीच्या माध्यमातून "ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी" चे विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी १.२५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. मात्र, काही गोविंदा त्यापासून वंचित राहिले. यंदा ही त्रुटी दूर करत विमा कवचाची मर्यादा वाढवून १.५० लाख गोविंदांपर्यंत हे संरक्षण पोहोचवले जाणार आहे.

यावर्षी राज्यभरातील अंदाजे १.५० लाख गोविंदांना विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत "दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई" या कंपनीचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन, अंधेरी (पूर्व), मुंबई यांच्यामार्फत आवश्यक कागदपत्रे सादर करून विमा रकमेचा खर्च शासनाकडून अदा केला जाणार आहे. क्रीडा व युवक सेवा विभाग, मुंबई यांना या संदर्भात सुसंवाद आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

एकूण एक कोटी बारा लाख ५० हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे. त्यानुसार उप सचिव (सुनील पांढरे) यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या शासन आदेशानुसार संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी ही योजना तत्काळ राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत

धक्कादायक! मुंबई IIT मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

मुंबई : मुंबईमधील पवईमधील IIT मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai Dadar Kabutar khana : कबुतरखाना हटवण्यासाठी मध्यरात्री पालिकेचं पथक दाखल… पण संतप्त जमावानं कारवाईला घातला आडवा! मध्यरात्री दादरमध्ये काय घडलं?

मुंबई : दादरमधील गाजलेला कबुतरखाना अखेर हटवण्याच्या तयारीला सुरुवात झाली, पण ही कारवाई नक्की कधी होणार, याचं

जुहू समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली

मुंबई : जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला

जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे

मनपाकडून सहा प्रकारच्या रंगांचे वाटप मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला अधिक बळकटी यावी यासाठी पालिकेकडून

चाकरमान्यांना कोकण रेल्वेत मिळणार उकडीचे मोदक !

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या चार आठवड्यांवर आला असून यावर्षी २७ ऑगस्ट रोजी गणरायाची प्रतिष्ठापणा होणार आहे. कोकणात