सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं…!

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आला. तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं! ठोस पुराव्यांअभावी न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल आल्यानंतर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी मार्मिक टिप्पणी करणारी प्रतिक्रिया दिली आहे.



मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल ही केवळ एक न्यायालयीन निकालाची बातमी नाही, तर काँग्रेसच्या विषारी आणि विखारी राजकारणाचा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. त्यांच्या मोहोब्बतच्या दुकानात तुष्टीकरणाच्या , द्वेषाच्या गोळ्या मिळतात हे चव्हाट्यावर आलं आहे..; असे भाजपच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.

हिंदू साध्वींना, राष्ट्रासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्यांना खोट्या पुराव्यांत अडकवण्यात आलं. का ? एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी? का विशिष्ट लोकांची पापं लपवण्यासासाठी…? ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचारात आणणाऱ्यांनी देशाच्या सामाजिक ऐक्यालाच गालबोट लावणाऱ्या काँग्रेसला कायद्याचा दणका मिळाला आहे.या विकृत काँग्रेसला संविधानाचा खरा अर्थ समजेल …कारण संविधानाच्या आधारावरच सत्याचा विजय झाला आहे; असेही भाजपच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.

याआधी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आला. तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व ७ आरोपींना निर्दोष मुक्त केलं! ठोस पुराव्यांअभावी न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला.

नेमके काय झाले होते ?

मालेगावच्या मशिदी जवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. मशिदी जवळ दुचाकीचा स्फोट झाला होता. या प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितसह साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि इतरांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची