तोतया पोलिसाने केली महिलेची चार लाखांची फसवणूक

  56

मुंबई : मुंबईतील घाटकोपर भागात सायबर फसवणुकीची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव वापरून एका महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायबर फसवणूक करणाऱ्यांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तिची ४ लाखांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी स्वतःची ओळख दिल्ली पोलिसांचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. याशिवाय सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला स्वतः या प्रकरणाची चौकशी करतील असेही त्यांनी या महिलेले सांगितले . पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.


अंधेरी येथे काम करणाऱ्या महिलेला १९ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने सांगितले की तिच्या आधार कार्डचा गैरवापर करून अनेक बँक खाती उघडण्यात आली आहेत आणि ती एका आर्थिक गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल सुरू केला ज्यामध्ये पोलिसांच्या गणवेशात असलेल्या दोन पुरुषांनी स्वतःची ओळख गुन्हे शाखेचे डीसीपी दया नायक आणि प्रमोद वर्मा अशी करून दिली. त्यांनी महिलेला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, सीबीआय चौकशी आणि तात्काळ अटक यासह कठोर कारवाईची धमकी दिली. यानंतर महिलेने घाबरून ४ लाख रुपये ट्रान्सफर केले.आरोपीने पुढील तपास सीबीआय अधिकारी रश्मी शुक्ला करतील असे या महिलेला सांगितले . दुसऱ्या दिवशी त्यांनी महिलेला दुसऱ्या नंबरवरून फोन केला आणि त्यादरम्यान पोलिसांच्या गणवेशातील अनेक लोक तिच्या समोर बसले होते. या प्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह

भाजपकडून गणेश भक्तांसाठी मोफत प्रवास!

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपने ३५० मोफत बसेस आणि विशेष रेल्वे सेवांची

गणेशोत्सवासाठी मेट्रोची 'वेळेत' वाढ!

मुंबई: एमएमआरडीएने (MMRDA) जाहीर केले आहे की, २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या ११ दिवसांसाठी मेट्रो मार्ग २ए आणि ७ वरील

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी , मुंबई ते मडगाव प्रवास होणार अधिक सोयीस्कर !

मुंबई : मुंबई ते मडगाव दरम्यान आतापर्यंत आठ डब्यांची ‘वंदे भारत’ चालवण्यात येत होती. मात्र, गणेश चतुर्थीच्या

अमित ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीत काय झाले ?

मुंबई : मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. मनसे प्रमुख राज ठाकरे