गणेशोत्सव काळात प्रवाशांवर लादलेली ३० टक्के बस भाडेवाढ रद्द

एसटी महामंडळाकडून समूह आरक्षण पुन्हा सुरू


मुंबई : एकीकडे गणपती उत्सव जवळ येत असताना गणेशोत्सव काळात एसटी महामंडळाच्या बसने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर अन्यायकारक लादलेल्या ३० टक्के बस भाडे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उलटू लागल्यानंतर ते बस भाडे कमी करण्याची नामुष्की  महामंडळावर आली होती. एसटी महामंडळाने दुसऱ्या दाराने प्रवाशांवर अन्ययाकारक वसुली लागू करण्याचा निर्णय परस्पर घेतला होता.


या बस भाडेवाढीनुसार मुंबई ठाण्याहून कोकणात गेलेल्या बस गाडीचे तेथील नजीकच्या आगारापर्यंतचे परतीचे भाडे एसटी महामंडळ प्रवाशांकडून वसूल करणार होती. त्यामुळे एका दाराने बंद केलेली बस भाडेवाढ मागील दाराने लादली गेली असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर ही दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे त्यामुळे स्थगित करण्यात आलेले समूह आरक्षण आज गुरुवारपासून पुन्हा जोराने सुरु होणार आहे.


ही भाडेवाढ अन्यायकारक असून प्रवाशांना दुप्पट भुर्दंड देणारी होती. यापूर्वी अशी छुपी भाडेवाढ करण्यात आली नव्हती. मुंबई ठाणे पालघर परिसरातून कोकणात निरनिराळ्या गाव तालुका वाड्यांमध्ये एसटी बसचे समूह आरक्षण केले जाते यापूर्वी फक्त तेवढेच बस भाडे प्रवाशांकडून वसूल केले जात होते मात्र कोणताही लिखित आदेश नसतानाही अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने या नव्या दरवाढीनुसार भाडे लागू केले होते.


एसटी बस आपल्या नियोजित ठिकाणी प्रवाशांना सोडल्यानंतर जवळच्या आगारापर्यंत रिकामी बस नेताना प्रत्येक प्रवाशामागे तिकीट वसुली केली जाणार होती. ही दरवाढ काही ठिकाणी ४० रुपये तर काही गावे ही कोकणातील दुर्गम ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी थेट ९० ते १०० रुपयांपर्यंत हा भुर्दंड बसणार होता, त्यामुळे ही अन्यायकारक बस भाडे वाढ रद्द करावी अशी मागणी गणेशभक्त कोकणवासीयप्रवासी संघाने केली होती.


या नव्या बस भाड्यामुळे सध्या समूह आरक्षणात पुन्हा बंद केले होते. ऐनवेळी या छुप्या वसुलीची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आजपासून समूह आरक्षण पुन्हा सुरु होणार आहे. आतापर्यंत ४०० बसचे समूह आरक्षण पूर्ण झाले आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या