'तुम्ही पाकिस्तानशी बोलता का?...', लोकसभेत अखिलेश आणि अमित शाह यांच्यात वादविवाद

  49

ऑपरेशन सिंदूर चर्चेदरम्यान अखिलेश यादव यांच्या मध्येच टोकण्याला अमित शहा यांचे जबरदस्त प्रत्युत्तर


नवी दिल्ली: लोकसभेत कालपासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यापासून या चर्चेला सुरुवात झाली, दरम्यान ही चर्चा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढे सुरू ठेवली. आज सुरू असलेल्या या चर्चेत अमित शाह आणि अखिलेश यादव यांच्यात आरोपांची चांगलीच रणधुमाळी उडालेली दिसली. लोकसभेत अमित शाह ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करत असताना मध्येच अखिलेश यादव यांनी त्यांना टोकले. ज्यावर अमित शहा यांनी "तुम्ही पाकिस्तानशी बोलता का?" असे म्हंटले. त्यामुळे एकच गोंधळ झाला, अखिलेश आणि त्यांचे समर्थक आसनांवरून उठत गोंधळ घालू लागले. दरम्यान अमित शहा यांनी त्यांना शांत राहत मी पुढे काय बोलणार आहे ते आधी ऐकून घ्या असे म्हंटले. नेमके काय आहे हे प्रकरण? सविस्तर जाणून घेऊया.


आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या मॅरथॉन चर्चेदरम्यान  सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले होते, त्याद्वारे पहलगामला दहशतवादी पाठवणाऱ्यांच्या आकांना संपवण्यात आले. पण आता भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव अंतर्गत २६ पर्यटकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांचा खात्मा केला. यावर सपा खासदार अखिलेश यादव यांनी शहा यांना मध्येच अडवून सांगितले की, त्यांचा आका  पाकिस्तान आहे, ज्यावर अमित शहा यांनी उत्तर दिले की, "तुम्ही पाकिस्तानशी बोलता का?"



'दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका'


यानंतर लोकसभेत गोंधळ सुरू झाला आणि सपाचे सर्व खासदार त्यांच्या जागी उभे राहिले. परंतु सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना शांत करत अमित शहा यांना त्यांचे बोलणे पुढे सुरू ठेवायला सांगितले. यानंतर अमित शहा पुढे म्हणाले की, दहशतवाद्यांच्या खात्माची माहिती मिळताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व खासदारांमध्ये आनंदाची लाट येईल असे मला वाटले होते, परंतु विरोधी पक्षाच्या खासदारांचे चेहरे तर काळे पडले आहेत. दहशतवाद्यांना मारल्यानंतरही ते गर्व करताना दिसत नाहीय.


यानंतर पुन्हा एकदा अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना त्यांच्या भाषणात मध्येच अडवले, त्यानंतर अमित शाह यांनी अखिलेशना जवाब देताना म्हंटले, "अखिलेश जी, दहशतवाद्यांचा धर्म पाहून तुम्ही दुःखी होऊ नका." अमित शाह म्हणाले की सहा शास्त्रज्ञांनी या अहवालाची पुष्टी केली आहे आणि मला सांगितले आहे की पहलगाममध्ये चाललेल्या गोळ्या १०० टक्के त्याच आहेत.


अमित शाह सभागृहात म्हणाले की पहलगाम हल्ल्यानंतर मी तिथे गेलो आणि पीडितांच्या कुटुंबियांना भेटलो. सहा दिवसांपूर्वी लग्न झालेली एक मुलगी तिथे विधवा म्हणून उभी होती, मी माझ्या आयुष्यात ते दृश्य कधीही विसरू शकत नाही. पण आज मी त्यांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादयांना तेथे पाठवणाऱ्यांना मारले आणि आमच्या सुरक्षा दलांनी त्या दहशतवाद्यांनाही ठार केले.  आम्ही असा धडा शिकवला आहे की, येणाऱ्या अनेक काळापर्यंत कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही.



तुमचे सरकार असताना तुम्ही किती दहशतवादी मारले? 


विरोधकांच्या प्रश्नांवर अमित शाह म्हणाले की, वारंवार विचारले जाते की पहलगाममध्ये दहशतवादी कुठून आले आणि ते कसे पळून गेले, म्हणून मी सांगू इच्छितो की आम्ही सरकारमध्ये आहोत, जबाबदारी आमची आहे. पण त्याच वेळी मी विचारतो की तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही जबाबदारी का घेतली नाही? यानंतर अमित शहा यांनी काँग्रेस सरकारच्या काळात देश सोडून पळून गेलेल्या दाऊद इब्राहिम, सय्यद सलाउद्दीन, टायगर मेमन सारख्या अनेक दहशतवाद्यांची नावे मोजली आणि म्हणाले की पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांना आमच्या सैन्याने मारले, तुम्ही काय केले?



ऑपरेशन महादेवची दिली माहिती


लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन महादेवची देखील बातमी दिली. ते म्हणाले की पहलगाममध्ये निष्पाप नागरिकांना मारणारे तीन दहशतवादी काल 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत मारले गेले. त्यांनी सभागृहाला सांगितले की यासाठी सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई केली होती आणि अनेक पातळ्यांवर दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. अमित शाह म्हणाले की दहशतवाद्यांच्या शोधासाठी एका महिन्याहून अधिक काळ शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्यानंतर २२ जुलै रोजी सेन्सर्सद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्तचर संघटनेला माहिती मिळाली. ते म्हणाले की सोमवारी केलेल्या कारवाईत सुलेमान, अफजान आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. चकमकीनंतर, दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या रायफल्सच्या काडतुसांच्या एफएसएल अहवालातून दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली.


Comments
Add Comment

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या

एलन मस्कच्या ‘स्टारलिंक’ला भारतात परवाना

आता प्रत्येक गावात पोहोचणार थेट इंटरनेट नवी दिल्ली : अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्टारलिंक

इंडिगो फ्लाइटमध्ये हाणामारी! एकाने दुसऱ्याच्या दिली कानशिलात, पुढे काय झाले? पहा व्हिडिओ

कोलकाता: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एअर होस्टेस एका प्रवाशाला मदत करताना दिसून येत आहे.

स्मृति इराणी म्हणतात, ‘भारतातला प्रत्येक मुलगा-मुलगी होणार क्रिएटर’

नवी दिल्ली : "भारतीय रचनात्मकतेची क्रांती आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती शाळेच्या वर्गातून

माजी पंतप्रधानांचा नातू बलात्कारात दोषी! पीडितेची साडी ठरली पुरावा

बंगळुरु : भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवगौडा यांचा नातू आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल