मुंबई: शरद पवार गट राष्ट्रवादी पक्ष महिला अघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल यांना पुण्यात रेव्ह पार्टी करतांना पोलिसांनी रंगेहात पकडल्या नंतर रोहिणी खडसे यांची पदावरून हकालपट्टी करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता भाजप आणि पोलिसांवरच खडसे यांचा पक्ष आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. ज्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून विखारी टीका केली.
महायुती सरकारला विरोध करायचा आणि खडसे बापलेकीला समर्थन द्यायचे म्हणून शरद पवार गटाचे व उबाठाचे नेते काहीही बोलत सुटले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना राम कुलकर्णी यांनी सुप्रिया सुळे, रोहित पवार यांबरोबरच शरद पवार राष्ट्रवादी पक्षधोरणांवर देखील प्रश्न उपस्थित केले. "जयंत पाटील पायउतार झाल्यापासून पक्षात प्रमुख भुमीका बजावणारे, सत्ताधारी पक्षावर बेछूट अरोप करत मोबाईल फूटेस्तोवर ट्विट करणारे रोहित पवार यांची दातखिळी बसली का ?" असा सवाल त्यांनी केला. तर "सुप्रिया सुळे या प्रकरणात रोहिणी खडसे यांचा राजीनामा घेतील असे वाटले पण त्यांनाही सदर प्रकरणात राजकिय वास येणे योग्य नव्हे." असे देखील त्यांनी म्हंटले.
पुणे: रेव्ह पार्टीत (Pune Rave Party) पती प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पत्नी रोहिणी खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रांजल ...
रोहिणी खडसे यांच्या राजीनाम्याची मागणी
शरद पवारांच्या पक्षात काही नैतिकता असेल तर खऱ्या अर्थाने अगोदर रोहिणी खडसे यांचा त्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी करत आपला तो बबल्या दुसऱ्याचं कार्ट , असं राजकारण चालत नसतं असे खडसावले.