दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र पाचव्या स्थानी

‘सबका साथ, सबका विकास’मुळे प्रगती


नवी दिल्ली :चालू आर्थिक वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न १,१४,७१० रुपये झाले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत यासंबंधी माहिती दिली. २०१४-१५ मध्ये स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ७२,८०५ रुपये होते. गेल्या दशकात ४१,९०५ रुपयांनी वाढ झाली आहे.


राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या जीडीपीच्या तात्पुरत्या अंदाजानुसार, २०२४-२५ साठी स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न १,१४,७१० रुपये आहे. दहा वर्षांपूर्वी हेच प्रमाण ७२,८०५ रुपये एवढे होते.
भारताच्या अनेक राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही दरडोई उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.



कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाची प्रगती


२०१३-१४ साली महाराष्ट्र सर्वाधिक दरडोई उत्पन्नाच्या यादीत हरियाणानंतर दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,०९,५९७ इतके होते. दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन दरडोई उत्पन्न १,१५,०५८ रुपयांवर पोहोचले होते. २०१४-१५ साली कर्नाटकचे दरडोई उत्पन्न १,०५,६९७ रुपये, तामिळनाडूचे १,०७,११७ रुपये व तेलंगणाचे १,०१,४२४ रुपये इतके उत्पन्न होते. महाराष्ट्राच्या मागे असलेली ही तीनही राज्य आता पुढे गेली आहेत. महाराष्ट्राची मात्र म्हणावी तशी आर्थिक प्रगती झालेली दिसत नाही.



देशातील दरडोई उत्पन्नात राज्यांची क्रमवारी


कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेश, पंजाब, ओडिशा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, आसाम, मेघालय, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, झारखंड, केरळ, मणिपूर, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदिगड, दिल्ली, लडाख.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या