इम्फाळ : गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे मणिपूरमध्ये केंद्र सरकारकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. आता या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. आता हा कालावधी १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत लागू असणार आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट वाढवण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. राज्यात शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला संसदेने मंजुरी दिली. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती राजवटीचा कालावधी पुन्हा एकदा सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे.