गडचिरोलीत पाच हजार लाभार्थी कुटूंबासाठी 'उपजिविका विकास कार्यक्रम' राबविण्यात येणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आकांक्षित तालुक्यांचे होणार सक्षमीकरण


मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून 'उपजिविका विकास कार्यक्रम' राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत ४९ गावांचा समावेश असून यात अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनचा सक्रीय सहभाग असणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा प्रकल्प राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमासाठी आगामी तीन वर्षासाठी २०.३४ कोटी रूपये इतके तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून पाच हजार लाभार्थी कुटुंबांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.


गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांचे जीवनमान उंचावणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यास शासन प्राधान्य देत आहे. शासनाच्या या धोरणाला प्रतिसाद देत अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशनच्या सक्रिय सहभागातून गडचिरोलीत उपजिविका विकास कार्यक्रमांतर्गत काम सुरू झाले आहे. हवामानाशी सुसंगत शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन, उपजिविकेत सुधारणा करणे, नागरिकांचे जीवनमान उंचावून समुदायाचे कल्याण साधणे हे प्रमुख उद्दिष्टे या प्रकल्पात पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य उपक्रमांतर्गत शेती आधारित उपजिविका, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतीतर उपजिविका हस्तक्षेप, सामूहिक उद्योजकता, आरोग्य आणि पोषण या बाबींवर लक्ष देण्यात येईल.


३० जून २०२५ पर्यंत या उपक्रमात २,००० कुटुंबांची नोंदणी झाली आहे. एकूण ६६ बोडींचे गाळमुक्तीकरण करून त्यांच्या जलधारण क्षमतेत वाढ करण्यात आली आहे. बोडी आधारित शेती प्रणालीत माशांचे संगोपन, त्यावर कुक्कुटपालन आणि त्याच पाण्याचा वापर पिकांना दिला जातो. ही पद्धत शेती उत्पादकतेत वाढ करुन ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे विविध मार्ग उपलब्ध करून देते.


२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पांद्वारे सहभागी कुटुंबांना लाभ होईल. त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या तुलनेत उत्पन्न दुगुणी होईल. तसेच शेती उत्पादकता वाढवून उपजिविकेच्या संधी उपलब्ध होतील. शेतकरी गटांच्या माध्यमांतून सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल, तसेच पोषण आणि आरोग्य विषयक जनजागृतीमुळे जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यासही सुरुवात होईल.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी