जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर सवाल, मँचेस्टर कसोटीत गोलंदाजीमध्ये धार नाही

मँचेस्टर: इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहवर सगळ्यांच्या नजरा आहेत. दरम्यान, बुमराहची कामगिरी अद्याप चमकदार दिसलेली नाही. बुमराहने इंग्लंडच्या पहिल्या डावात २३ षटके टाकली. त्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. तसेच ७९ धावाही खर्च केल्या. बुमराहला २४व्या षटकांत विकेट मिळाली. त्याने जेमी स्मिथला बाद केले.


जसप्रीत बुमराह मँचेस्टर कसोटी सामन्यादरम्यान थकलेला दिसत होता. बुमराहची लेंथ लाईन योग्य नव्हती. त्याने काही बॉल साईडला टाकले. तर काही बॉल जर गरजेपेक्षा शॉर्ट ठेवले. बुमराह साधारणपणे १३८-१४२च्या वेगाने गोलंदाजी करतो. मात्र या सामन्यात त्याने एकही बॉल १४०च्या वर स्पीडने फेकली नाही. अशातच बुमराहच्या फिटनेसवर सवाल उपस्थित केले जात आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही म्हटले की बुमराहच्या गोलंदाजीमध्ये ती धार दिसत नाही जी लॉर्ड्स कसोटीत दिसत होती.


जेव्हा इंग्लंडच्या पहिल्या डावात भारताचा कर्णधार शुभमन गिलने दुसरा नवा बॉल आणला तेव्हा जसप्रीत बुमराहने केवळ एक षटक टाकले आणि तो मैदानाबाहेर गेला. दरम्यान, थोड्या वेळाने तो मैदानात परतला मात्र या घटनेने स्पष्ट संकेत दिले की सामन्यात त्याचे शरीर पूर्णपणे साथ देत नाही.


जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीदरम्यान जसप्रीत बुमराहला पाठीला दुखापत झाली होती. पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराह इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला. तो एक छोटा फॉरमॅट होता. यात गोलंदाजाला अधिकाधिक ४ षटके टाकता येत. कसोटी क्रिकेटमधील मोठ्या स्पेल्ससाठी बुमराहचे शरीर तयार नव्हते. यामुळेच निर्णय घेण्यात आला की तो सध्याच्या कसोटी मालिकेत केवळ ३ सामने खेळणार आहे. हेड कोच गौतम गंभीरनेही हे कन्फर्म केले होते.


Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय

भारत - दक्षिण आफ्रिकेचा आज धर्मशालात महामुकाबला

मालिकेवरील वर्चस्वासाठी चुरस; १-१ बरोबरीमुळे महत्त्व मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२०