IEX Share काल ३०% कोसळला आज सकाळी १२% उसळला 'या' कारणामुळे!

प्रतिनिधी: काल २८ ते ३०% आईएक्स (IEX) शेअर कोसळला होता जो सकाळच्या सत्रात पुन्हा १२% वाढला. सकाळच्या सत्रात या शेअर्समध्ये झालेली वाढ ही तिमाही निकालातील आधारावर झाली. कंपनीचा काल पहिला तिमाही निकाल (Q1FY 26 Result) लागला. या निकालातील माहितीनुसार, कंपनीला इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) एकत्रित निव्वळ नफ्यात (Consolidated Net Profit) मध्ये २५% वाढ झाली. मागील तिमाहीतील ९६ कोटींच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात २५% वाढ झाल्याने निव्वळ नफा १२० कोटींवर पोहोचला आहे.


या कारणांमुळे काल झालेली घसरण गुंतवणूकदारांनी भरून काढली. सरकारच्या एका अध्यादेशाने तिमाही निकालांच्या तोंडावरच शेअर्समध्ये परिणाम झाला. सरकारने आईएक्स (India Energy Exchange IEX) या विजेच्या व्यापार होत असलेल्या एक्सचेंज मध्ये वीज किंमतीची बोली एकसमान असली पाहिजे असा अध्यादेश जारी करून याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यामुळे आता पॉवर कंपलिंगनुसार अनेक पॉवर एक्सचेंजमध्ये बोल्या लावून त्यांना एका ठराविक किंमतीसाठी एकत्रितपणे एक्सचेंजसाठी मंजूरी देणार असल्याचे केंद्रीय विद्युत नियामक आयोगाने (CERC) नियामक मंडळाने स्पष्ट केले त्यानंतर बाजारात कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने गुंतवणूकदारांचे १४८० कोटींचे नुकसान झाले होते. सकाळच्या सत्रात मात्र तिमाही निकालानंतर वाढ झाली आहे.


आईएक्सला तिमाहीतील निकालाप्रमाणे, कंपनीने नफ्यासोबत महसूलातही वाढ नोंदवली आहे. कामकाजातून मिळालेल्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १३% वाढ झाल्याने १२४ कोटींवरून महसूल १४० कोटींवर पोहोचला. तथापि, IEX साठी गळ्या गोष्टी काही आलबेल नाहीत. बाजार तज्ञांच्या मते, नवीनतम घडामोडी कंपनी आणि स्टॉकवर लक्षणीय परिणाम करू शकतात कारण त्याचा थेट परिणाम व्यवहार उत्पन्नावर होईल, जो सूचीबद्ध घटकाच्या (Listed Entity) एकूण उत्पन्नाच्या ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे, फर्मच्या स्टॉक किमतीत आणखी सुधारणा अपेक्षित आहेत. त्यामुळे अखेरच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये काय हालचाल होते ते पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा