'या' कारणांसाठी घेता येणार वर्षातून महिनाभराची सुट्टी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्यसभेत मोठा निर्णय

नवी दिल्ली: मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी वर्षभरातून ३० दिवसांची रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल, आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल, तसेच तुम्हाला कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ देता येत नसेल, तर आता तुमची चिंता मिटली आहे.  कारण आता केंद्र सरकारी कर्मचारी त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत या निर्णयाची माहिती दिली.



डॉ. जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले?


केंद्र सरकारचे कर्मचारी ३० दिवसांची अर्जित रजा घेऊ शकतात. ज्यामध्ये ते त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकतात तसेच त्यांची इतर अनेक वैयक्तिक कामे पूर्ण करू शकतात.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय नागरी सेवा नियम १९७२  अंतर्गत, कर्मचाऱ्याला दरवर्षी ३०  दिवसांची अर्जित रजा दिली जाईल. याशिवाय, कर्मचाऱ्याला २० दिवसांची अर्धवेतन रजा, ८ दिवसांची प्रासंगिक रजा आणि २ दिवसांची मर्यादित रजा मिळते.


कर्मचारी वैयक्तिक कारणांसाठी या सर्व रजा घेतो. डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या सर्व रजा वृद्ध पालकांच्या काळजीसह वैयक्तिक कारणांसाठी घेता येतात. केंद्रीय सरकारी कर्मचारी, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही समाविष्ट आहेत, त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी रजा घेऊ शकतात.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व