थकीत पीक कर्जाच्या डोंगरामुळे जिल्हा बँका अडचणीत

कर्जमाफीच्या आश्वासनांमुळे कर्ज भरण्यास शेतकऱ्यांकडून टाळाटाळ


मुंबई : महायुती सरकारमधील अनेक नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्जमाफी होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास केलेली टाळाटाळ आता त्यांच्यासह जिल्हा बँकांसाठी अडचणीची ठरत असल्याचे दिसत आहे. राज्यात ३० जून २०२५ अखेर थकीत पीककर्जाची रक्कम ३७ हजार ३९२ कोटींवर पोहोचली आहे.


विधानसभेच्या निवडणुकीत राज्यांमध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत जनतेने महायुतीला प्रचंड बहुमत दिले. त्यामुळे कर्जमाफी आश्वासनाची पूर्तता सरकार करेल, अशी अपेक्षा असल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करण्याकडे दुर्लक्ष केले. सरकारकडून कर्जमाफीचे ठाम आश्वासन मिळाले नसल्याने थकबाकी असलेला शेतकरी व पर्यायाने राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत.


थकबाकीमुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. थकीत कर्जामुळे अनेक जिल्हा बँकांचे वसुलीचे प्रमाण घटले असल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. राज्याच्या सहकार खात्याने दिलेल्या माहितीनुसार जून २०२५ अखेर अल्प, मध्यम मुदतीचे सुमारे ३७ हजार कोटी रुपयांचे कृषीकर्ज थकले आहे.

Comments
Add Comment

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे

बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता