श्रावण महिन्याला २५ जुलैपासून म्हणजे आजपासून प्रारंभ होत आहे पहाटे ५ ते सकाळी ७ वाजेपर्यंत शनिशिंगणापूर येथे सर्व भाविकांसाठी शनी देवाच्या चौथऱ्यावर जाऊन जल अर्पण करता येणार आहे. ही सेवा श्रावण मासात म्हणजे २५ जुलै ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सुरू राहणार आहे.
शनिशिंगणापूर येथे परिसरातील रोज हजारो भाविक भक्त पहाटे पायी येऊन मंदिर परिसरात स्नान करून ओल्या वस्त्राने शनी चौथऱ्यावर जाऊन कळशी व लोट्याने जल अर्पण करतात. श्रवण महिन्यात अनेक भाविक भंडारा प्रसादाचे आयोजन करत असतात.