माणिकराव कोकाटे यांचे कृषीमंत्रीपद जाणार, कोण होणार नवे कृषीमंत्री?

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधानसभेतील रमी प्रकरण राजकारणात चांगलेच तापले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी दिवसागणिक जोर धरू लागली आहे. मात्र, मी काही चुकीचे केलेच नाही असे म्हणत कोकाटे यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले. मात्र, आता कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याऐवजी मकरंद पाटील यांना कृषी खातं सोपवण्यात येऊ शकतं असा अंदाज आहे.


रमी प्रकरणाविषयी कोकाटे यांनी आपली बाजू स्पष्ट जरी केली असली तरी, त्यांच्या काही वक्तव्यामुळे पक्षाने त्यांच्याविषयी नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांचे मंत्रीपद ताबडतोब रद्द केले जाणार नाही, मात्र त्यांना कृषी खात्याच्या जबाबदारीतून हटवले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्याऐवजी त्यांना सध्या मकरंद पाटील यांच्याकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खातं सोपवले जाईल, असा अंदाज आहे.


विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढत चालली आहे. तसेच त्यांची वक्तव्य सरकारला अडचणीत टाकणारी ठरत आहेत. पण म्हणून त्यांना मंत्रीपदावरून तात्काळ काढणे योग्य ठरणार नसल्यामुळे, फक्त त्यांच्या खात्यात बदल केले जाणार असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.



मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवणार कृषीमंत्री पदाची धुरा ?


गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य तसेच सभागृहात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने महायुतीतील मंत्री असलेले माणिकराव कोकाटे हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली आहे. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी कोकाटे यांच्याविरोधात रस्त्यावरती अनेक आंदोलनंही झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा एकंदरच खूप अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली असतानाच आता कोकाटे यांचं मंत्रीपदाचं खात बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद आबा पाटील यांच्याकडे असलेलं मदत व पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना मिळू शकतं. तर कृषीमंत्रीपदाची धुरा ही मकरंद पाटील यांच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच हा प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी