त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी नागरिकांना सर्पदंशासंदर्भात योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तत्काळ उपचाराचे महत्त्व समजावून सांगत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
*सर्पदंश झाल्यास काय करावे?*
• रुग्णाला शक्य तितके स्थिर व शांत ठेवावे
• रुग्णाची हालचाल टाळावी, शक्य असल्यास उचलून घ्यावे
• दंश झालेला अवयव हृदयाच्या खाली ठेवावा
• जखमेवर साफ कपड्याने हलका दाब द्यावा – कसून बांधणे टाळा
• तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात रुग्णाला पोहोचवा
• श्वासोच्छ्वास अडचण असल्यास – CPR/ऑक्सिजन सुविधा वापरा (उपलब्ध असल्यास)
• शक्य असल्यास सापाचा फोटो घ्या (पण सापाला हात लावू नका)
• सर्पदंशाची वेळ लक्षात ठेवा
*सर्पदंश झाल्यास काय करू नये?*
• पारंपरिक उपचारांवर (जडीबुटी, मंत्र, झाडफळं) विश्वास ठेवू नका
• जखमेवर चिरा करू नका, विष शोषू नका
• बर्फ किंवा गरम पाण्याचा वापर टाळा
• रुग्णास खाणे/पिणे देऊ नका
• वेदनाशामक, झोपेची औषधे किंवा मद्य देऊ नका
• सापाला पकडू किंवा मारू नका
• जखम कसून बांधू नका, त्यामुळे रक्ताभिसरण थांबते
*प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा:*
• ASV (Anti Snake Venom) उपलब्ध
• प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी
• अॅड्रेनालिन, अट्रोपीन, निओस्टिगमीन व इतर आवश्यक औषधे
• २४x७ उपचाराची व्यवस्था
*नागरिकांना आवाहन:*
• रात्री बूट, टॉर्च, काठी वापरून बाहेर पडा
• परिसर स्वच्छ ठेवा, झाडेझुडपे व ओला कचरा हटवा
• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा
• शेतात काम करताना गमबूट वापरा
• रात्री चालताना जोरात पावले टाका – साप दूर राहतात
• झोपताना शक्य असल्यास उंचावर झोपा
• मुलांवर विशेष लक्ष ठेवा
• १०२ / १०८ क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा