प्रतिनिधी: अखेर युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या हुकुमाचा एक्का बाहेर काढला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट लिहित जपानवर केवळ १५% रेसिप्रोकल टेरिफ (Reciprocal Tariff) लावण्याचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आ हे. ट्रम्प यांची ही खेळी आशियाई बाजारात 'मोठी' समजली जाते. ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे, जपान युएस मध्ये ५५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याशिवाय ट्रम्प यांनी म्हटले की जापनीज कंपन्यांना युएसमध्ये होत असलेल्या नफ्यापैकी ९०% नफा मिळे ल. या अटीशर्तीवर हे मोठे 'डील' झाल्याचे ट्रम्प यांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले आहे.
ट्रम्प यांच्या पोस्टनंतर जपानचे व्यापार वाटाघाटी प्रमुख रायोसोई अकाझवा (Ryosei Akazawa) यांनी #Mission Accomplished ' अशा शब्दांत पोस्ट केली. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी नेमके म्हटले आहे की,' कदाचित आतापर्यंतचा सर्वात मोठा करार अ से सांगताना जपान अमेरिकेत $५५० अब्ज गुंतवणूक करेल आणि अमेरिकेला "नफ्यातील ९०% रक्कम मिळेल. याशिवाय अतिरिक्त माहिती देताना ट्रम्प म्हणाले की,' जपान त्यांच्या कार,ट्रक,तांदूळ व इतर कृषी उत्पादनातून युएसमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे.' माहितीनुसार १५% टेरिफ व्यतिरिक्त ऑटो टेरिफमध्ये लक्षणीय घट होऊ शकते सध्या यांचे दर २५% आहेत जे घसरत १५% वर आले आहे.
जपानच्या ऑटो सेक्टर आकडेवारीत में महिन्यात २४.७% वरून जूनमध्ये २६.७% वर वाढले झाली होती. त्यामुळे आता अमेरिकेने दिलेल्या ग्रीन सिग्नलमुळे या निर्यातीत अधिक वाढ होईल याची भावनेने आशियाई बाजारातील सुरुवातीच्या कलात आज मोठी वा ढ झाली आहे.ऑटो सेक्टरचे जपानी अर्थव्यवस्थेतील योगदान २८ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे जपानशी सलगी करून चीन विरोधातील धोरणाला पर्याय म्हणून ही खेळी ट्रम्प यांनी खेळली आहे. या घडामोडींमुळे जपान बाजाराने उसळी घेतली ज्यात सर्वाधिक वा टा ऑटो क्षेत्राचा होता. प्रदीर्घ वाटाघाटींनंतर हा करार झाला आहे, ज्यामध्ये असे वृत्त आहे की जपानकडे अलीकडच्या संसदीय निवडणुकांपूर्वी हालचाली करण्यासाठी मर्यादित पर्याय आहेत. गेल्या आठवड्यातच, ट्रम्प यांनी जपानी आयातीवर पूर्ण २५ टक्के कर लागू करण्याची सूचना केली होती, त्यामुळे रेसिप्रोकल टेरिफवर निर्णय घेण्यास दोन्ही बाजूने उशीर झाला. इतर राष्ट्रांसोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी ही घोषणा केली.