अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन


पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै ते २० सप्टेंबर या कालावधीकरीता ‘अभय योजना’ विविध टप्प्यामध्ये लागू केली. या योजनेचा नागरिकांनी लाभ घेऊन आपला मालमत्ता कर पूर्ण भरावा असे आवाहन पनवेल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद दिसत असून चार दिवसांत पालिकेच्या तिजोरीत १३ कोटी १६ लाख मालमत्ता कर जमा झाला.


येत्या काळामध्ये महानगरपालिकेने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले. विविध विकास कामांमध्ये प्रस्तावित कामांमध्ये नवीन मुख्यालय बांधणे, मच्छीमार्केट, बहुमजली वाहनतळ, शाळा, दैनिक बाजार, प्रभाग कार्यालये ‘हिरकणी’ हे माता व बाल संगोपन रुग्णालय-सर्व समावेशक ४५० बेडचे हॉस्पीटल उभारत आहे. या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शास्ती सवलत अभय योजना


थकीत मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देण्याबाबत अभय योजनेमध्ये चार महत्त्वाचे टप्पे आहेत. यामध्ये प्रामुख्याने १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपूर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये ९० टक्के सूट मिळणार आहे. त्यामुळे मालमत्तांधारकांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपला पूर्ण मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालाधीत संपूर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये ७५ टक्के सूट मिळणार. या पुढील काळात म्हणजे १ सप्टेंबर २०२५ ते १० सप्टेंबर कालावधीत संपूर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास शास्तीमध्ये ५० टक्के सूट मिळेल आणि ११ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालाधीत संपूर्ण मालमत्ताकर एकरकमी भरल्यास असलेल्या शास्तीमध्ये २५ टक्के सूट मिळणार आहे. ही अभय योजना केवळ एकवेळची विशेष आणि अंतिम बाब म्हणून जाहीर करण्यात आली आहे.


ऑनलाइन भरल्यास २ टक्के सलवत


पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईट, पनवेल कनेक्ट ॲपद्वारे नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाइन भरल्यास त्यांना २ टक्के सवलत मिळेल तसेच चालू वर्षाचा म्हणजे २०२५-२६ चा कर ३१ जुलैपर्यंत भरल्यास त्यांना या करामध्ये ५ टक्के सूट मिळेल, तरी नागरिकांनी लवकरात लवकर कर भरणा करून याचा लाभ घ्यावा असे मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे यांनी आवाहन केले. ही अभय योजना २४x७ सुरू असून यासाठी महापालिकेने नवीन मालमत्ता कर संकलन केंद्रे सुरू केली आहेत.
१. मालमत्ता कर संकलन केंद्र-प्राईड सोसायटी सेक्टर ७, खारघर
२. महा ई-सेवा केंद्र-गंगा टॉवर, सेक्ट र २१ कामोठे
३. महा ई-सेवा केंद्र-ऍलियश बिल्डिंग से १७ प्लॉट नं. ८४ मोठा खांदा नवीन पनवेल
४. सर्व ५ प्रभाग कार्यालये (नावडे उपविभागासहित)
५. मुख्यालय पनवेल
तरी आत्ता आणि एकदाच असलेल्या अभय योजनांचा लाभ संबधित नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!