Prakash Abitkar : कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

मुंबई : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली.


राज्यातील कामगार रुग्णालयामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून राज्यातील कामगार रुग्णालयासंबंधीत प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यांनी भेटीदरम्यान केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांचे महाराष्ट्रातील ESIC रुग्णालयांच्या सद्यस्थितीकडे विशेष लक्ष वेधले. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांनी लवकरच अंधेरी येथील ESIC रुग्णालयास आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांच्यासमवेत संयुक्त भेट देण्याचे आश्वासन दिले. तसेच, राज्यातील सर्व ESIC रुग्णालयांबाबत एक सविस्तर आढावा बैठक घेण्याचेही त्यांनी सांगितले.


कर्मचारी विमाधारक (IP) संख्या वाढवण्याबाबत डॉ.मांडविया यांनी सकारात्मकता दर्शवली. यासाठी सध्याची उत्पन्न मर्यादा रू.२१,००० वरून रू.३०,००० पर्यंत वाढवण्यावर सकारात्मक चर्चा झाली. या निर्णयामुळे अधिक कामगार ESIC च्या आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील. कामगार व त्यांचे कुटुंबीयांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी राज्याला अधिक निधी देण्याची विनंती आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केली. सद्यस्थितीत २१,०००/- हजार रुपये मासिक उत्पन्न असलेल्या कामगारांना विमा योजनेचा लाभ घेता येतो. ही उत्पन्न मर्यादा ३०,०००/- हजार रुपये पर्यंत वाढवण्याची मागणी यावेळी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांकडे करण्यात आली. उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यास विमाधारक कर्मचाऱ्यांची संख्याही वाढेल तसेच अनेक कामगारांना या योजनेचा लाभ घेता येईल.



राज्यात कामगार विमा सोसायटीची पंधरा रुग्णालये असुन योजनेची संलग्नित असलेल्या ४५० खाजगी रुग्णालये व १३४ सेवा दवाखान्याच्या माध्यमातून कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्यात सद्यस्थितीत ४८ लाख ७० हजार ४६० विमाधारक कामगार असुन, कामगार व त्यांचे कुटुंबीय मिळून सुमारे दोन कोटी नागरिक विमा योजनेचा लाभ घेतात. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री यांच्या भेटीत उल्हासनगर, अंधेरी, कोल्हापूर येथील बांधकामांची सद्यस्थिती, विविध ठिकाणी सुरू असलेल्या रुग्णसेवा बाबतची चर्चा झाली.


अंधेरी, कोल्हापूर आणि उल्हासनगर येथील ESIC रुग्णालयांची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती कार्यान्वित करण्यासाठी ESIC महासंचालकांना सूचना देण्यात येतील, असेही डॉ. मांडविया यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील ESIC रुग्णालयाची श्रेणीवाढ करण्याबाबतही विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


केंद्रीय मंत्री श्री.मनसुख मांडविया यांनी सर्व प्रश्नांच्या सोडवणुकी बाबतीत सकारात्मक चर्चा केली. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री यांच्या समवेत मुंबईतील अंधेरी येथील ESIS रुग्णालयास संयुक्त भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील सर्व ESIC रुग्णालयांबाबत एक सविस्तर आढावा बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या, असेही केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. या भेटीमुळे महाराष्ट्रातील ESIC आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल आणि विमाधारक कर्मचाऱ्यांसाठी उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी या भेटीबाबत सांगितले. या भेटीच्या वेळी आरोग्य सचिव वीरेंद्र सिंग, ESIS चे आयुक्त रमेश चव्हाण व इतर अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai Local Automatic Door video : नव्या लोकलचा मेकओव्हर! लोकलचा पहिला VIDEO व्हायरल, आता स्टेशन येताच आपोआप.... नवी लोकल पाहून व्हाल थक्क

मुंबई : मुंबईकरांची 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये

पुढील तीन ते चार दिवसांत नुकसानग्रस्तांच्या खात्यावर भरपाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात ६० लाख हेक्टरचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत ने

महापालिका आरोग्य विभागाला माणसांपेक्षा श्वानांची चिंता!

रेबीज नियंत्रणासाठी श्वानांचे लसीकरण, पण चावा घेतलेल्यांना मिळत नाही लस मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबईला सन वर्ष

जय शहांचे नाव घेत शिंदे सेनेवर टीका करणा-या ठाकरेंच्या नेत्याला भाजपने सोलून काढले

मुंबई: दसरा (विजयादशमी) मेळाव्याच्या आयोजनावरुन उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना जय शहा

उद्धव गटाने दसरा मेळावा सोनिया गांधींच्या अंगणात घ्यावा

मुंबई: त्यांचे हाय कमांड दिल्लीत बसतात आणि त्यांच्याकडे विमान भरण्याइतकेही समर्थक नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला

दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागली

परतीच्या पावसामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान नवी मुंबई : दसरा सणासाठी झेंडू, आंब्याच्या डहाळ्या,