भायखळा येथे पहिले वस्त्रसंग्रहालय साकारणार!

पहिल्या टप्प्यातील ‘म्युझिकल फाऊंटन शो’चे काम प्रगतिपथावर


मुंबई : मुंबईत भायखळा येथे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय लगत पहिले वस्त्रसंग्रहालय साकारत आहे. दोन टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील म्युझिकल शो’चे काम प्रगतिपथावर आहे. या ‘म्युझिकल शो’मधून मुंबई व गिरणी कामगारांच्या इतिहासाचे दर्शन घडवण्यात येणार आहे.


मुंबई शहराला कापड गिरण्यांचा मोठा इतिहास होता. पण अनेक कापड गिरण्या बंद होऊन त्या ठिकाणी मोठमोठे मॉल व्यावसायिक गाळे व निवासी इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे राज्य सरकार मुंबई महापालिका व राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या पुढाकाराने काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल येथे वस्त्रोद्योग संग्रहालय व सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्यात येत आहे. इंडिया युनायटेड मिलच्या ६४ हजार ९४७ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा पुरातन वास्तूंसह, पुरातन सूचित समाविष्ट करण्यात आली आहे. यातील ४४ हजार चौ. मीटर जागेवर मनोरंजन मैदान तसेच वस्त्रोद्योग संग्रहालय उभे राहत आहे.


वस्त्रसंग्रहालय तयार करण्याचे काम २ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या टप्पा-१ मधील आराखड्यांना मुंबई संस्कृती वारसा जतन समितीची डिसेंबर, २०१७ मध्येच मंजुरी मिळाली.



टप्पा दोनच्या कामाचांही शुभारंभ


वस्त्र संग्रहालयाच्या टप्पा दोनच्या कामाचांही शुभारंभ झाला आहे. टप्पा-२ मध्ये उर्वरीत ३७ हजार चौ.मी. जागेमध्ये वस्त्रोद्योग संग्रहालय व संग्रहालय सहाय्यक व्यवस्था तयार करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी होत असल्याने संगीत कारंज्यांच्या नोझल्सच्या कार्यप्रणालीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर कूपनलिकेंमधून पाणी तलावात सोडण्यात येते. पण पाणी अशुद्ध असल्यामुळे तळ्यामध्ये शेवाळ निर्माण होते. त्यामुळे कुपनलिकेचे पाणीही शुद्ध करण्यात येणार असेही सांगितले.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि

६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

Mumbai Port : मुंबई बंदर होणार 'प्रदूषणमुक्त'! JNPA मध्ये हायटेक सुविधा, मालवाहतूक होणार सुपरफास्ट...मुंबई बंदराने काढली पहिली निविदा

मुंबई : वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट लक्षात घेता, मुंबई बंदर प्राधिकरणाने 'हरित बंदर' (Green Port) बनण्याच्या

आज मतदानदिनी मेट्रो-३ मध्यरात्रीपर्यंत धावणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आज १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई सज्ज झाली आहे.

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१