संभाजीनगर : राज्याच्या पावसाळी अधिवेशनातला राडा संपत नाही त्यातच विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवरून लातूरमध्ये तुफान मारहाणीची घटना समोर आली. अशातच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्यांच्या बेडच्या बाजूला पैशांनी भरलेली एक बॅग पाहायला मिळाली होती. असं असतानाच आता मध्यरात्री त्यांच्या घरावर हल्ला झाल्याची मोठी घटना घडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर रविवारी रात्री (२० जुलै) उशिरा एका तरुणाने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे.मंत्री निवास परिसरात गोंधळ घालत त्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ व धमक्याही दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार तरुण प्रचंड नशेत असताना मंत्री शिरसाठ यांना भेटायचे आहे असे म्हणत थयथयाट करत होता. मंत्री निवासाच्या परिसरात गोंधळ घालत गाड्यांच्या मागे धाव घेतली. सुरक्षारक्षकांना शिवीगाळ करत धमक्याही दिल्याचा प्रकार उघड झालाय. दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने मंत्री शिरसाठ यांच्या बंगल्याबाहेर धाव घेत संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर पहारा वाढवला आहे . आता परिस्थिती नियंत्रणात असून घटनेचा अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.
मुख्यमंत्री फेलोंसाठी विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात ...
तरुण मद्यधुंद अवस्थेत
संजय शिरसाट यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव सौरभ घुले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्ला करताना हा तरूण मद्यधुंद अवस्थेत होता. ही घटना समोर येताच या तरुणाविरोदात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.