Ajit Pawar : पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेच्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा युक्त शीतल तेली उगले, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड शहर सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे (सीएफआय) महासचिव मनिंदर पाल सिंग आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांची दुरुस्ती, मार्गाची स्वच्छता, वैद्यकीय सुविधा आदी बाबींवर लक्ष द्यावे. स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशासनाने वेळोवेळी आढावा घ्यावा. केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळोवेळी सादर करावी. त्यानुसार आवश्यक तेथे त्रुटींची दुरुस्ती करता येईल, असेही ते म्हणाले. विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व सायकलपटू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सर्व ती तयारी करण्यात यावी. मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात.


यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने शहरात रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, स्पीड ब्रेकर बाबत आवश्यक कार्यवाही आदी कार्यवाही व्हावी असे सांगितले. शहरातील बहुतांश भागातून स्पर्धेचा मार्ग असल्याने वाहतूक वळविणे, बॅरीकेटिंग आदींच्या अनुषंगाने वेळेत माहिती दिल्यास सर्व पुर्वतयारी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.


जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने सादरीकरण केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनाच्या क्षमता आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचणार आहेत. स्पर्धेसाठी युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (युसीआय), स्वित्झर्लंडकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला असून लवकरच मान्यता मिळेल. स्पर्धा युसीआय आणि सीएफआय यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. आगामी ऑलिम्पक स्पर्धेची पात्रता स्पर्धा म्हणून ही स्पर्धा गणली जाणार आहे. स्पर्धेच्या मार्गाचे शहरात पुणे व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, ग्रामीण भागात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि विविध विभागांद्वारे संयुक्त पाहणी आणि मूल्यमापन करण्यात आले असून सीएफआयनेही रस्त्यांची संयुक्त पाहणी केली आहे. सीएफआयच्या समन्वयाने स्पर्धेचा प्राथमिक मार्ग निश्चित करण्यात आला असून त्यात चर्चेअंती काही बदल करण्यात येतील. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेच्या मानकांप्रमाणे रस्त्यासाठी तयारी करण्यात येईल.



पुणे शहर व पिंपरी चिंचवड, मावळ मुळशी पिंपरी चिंचवड, भोर,वेल्हे, मुळशी, पुणे शहर, पुरंदर आणि बारामती अशी चार टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेची मोठी पूर्वप्रसिद्धी आणि स्पर्धेदरम्यानही २५ देशात थेट प्रक्षेपण व्हावे असा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती आणि क्रीडा संस्कृतीला या स्पर्धेमुळे चालना मिळणार आहे, असेही ते म्हणाले. श्री. सिंग म्हणाले या स्पर्धेत सुमारे ५० देशांचे खेळाडू सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे. स्पर्धेसाठी भारतातील ४० खेळाडूंना संधी दिली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील १० खेळाडूंचा समावेश असेल. जगात आंतरराष्ट्रीय सायकल दिन साजरा केला जातो. मात्र भारतात राष्ट्रीय सायकल दिन नसल्याने या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेदरम्यानचा एक दिवस ‘राष्ट्रीय सायकल दिवस’ म्हणून घोषित केल्यास सायकलिंगला देशात चालना मिळेल, असेही ते म्हणाले.


ही सायकल स्पर्धा पाहून प्रेरणा मिळालेल्या नवोदित सायकलपटूंना सराव करता यावा यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे वेलोड्रम उभारण्यासाठी ३५ कोटी रुपयांचा प्रस्ताव केला असल्याचे श्रीमती तेली उगले यांनी सांगितले. यावर या प्रस्तावाला तत्काळ निधी देण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे पदाधिकारी, पुणे महानगरपालिका, आरोग्य विभाग आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक

धाराशिवमध्ये हिट अँड रन, ऊसतोड मजुरांना उडवले

धाराशिव : धाराशिवमधील कळंब लातूर रस्त्यावर हिट हिट अँड रनची घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या कारने ऊसतोड

Devendra Fadanvis : पाच वर्षांनंतरही राज्यात महायुतीच दिसणार; मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास

गोंदिया : राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध राजकीय चर्चा आणि अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी