Monsoon Session of Parliament 2025: ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरवर लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा व्हावी अशी मागणी तसेच ट्रम्प यांनी आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा केल्यावरून देखील विरोधकांनी दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. दोन्ही सभागृहांचे कामकाज सध्या तहकूब करण्यात आले आहे.


राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. विरोधकांनी यानंतर जोरदार घोषणाबाजी केली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत. त्यांना मारलेही गेलेले नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणेचे अपयश आल्याचे उपराज्यपालांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी २४ वेळा सांगितले आहे की आम्ही युद्ध थांबवले. हे देशासाठी अपमानजनक आहे. सरकारने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणी खर्गे यांनी केली.


ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धबंदी, युद्धबंदीवरील डोनाल्ड ट्रम्पचे दावे आणि बिहार मतदार यादी यासारख्या मुद्द्यांवर लोकसभेत घेरण्याची रणनिती तयार करण्यात आली आहे. यानुसार आज पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ला आणि ट्रम्प यांचा दावा उचलण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आधीच प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करू असे स्पष्ट केले होते. यानंतर विरोधकांनी ही मागणी सुरु केली. सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. ही पद्धत योग्य नाही. पहिल्याच दिवशी हे वर्तन योग्य नाही. आपण हा गैरसमज मोडला पाहिजे. लोकसभेची कामकाज सल्लागार समिती दुपारी २.३० वाजता बैठक घेईल. विरोधकांनी त्यांना ज्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे ते मांडावे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. सभागृहात गोंधळ घालणे योग्य नाही, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते २१ ऑगस्ट असे ३२ दिवस चालणार आहे. १८ सत्रांमध्ये १५ हून अधिक विधेयके मांडली जाणार आहेत. यामध्ये ८ नवीन विधेयके असणार आहेत, तर उर्वरित प्रलंबित विधेयके असणार आहेत. बहुतांश कामकाज हे मुळ मु्द्द्यांवरून वाया जाण्याची शक्यता आहे.


Comments
Add Comment

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान

महाराष्ट्र ‘राजभवन; झाले आता ‘लोकभवन’

मुंबई : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे

सर्व नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च

महाराष्ट्रात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला राड्यांचे ग्रहण

मुंबई : महाराष्ट्रातील २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मंगळवार २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले. मतदानाची वेळ

महाराष्ट्रात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जाहीर

मुंबई : महाराष्ट्रातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या