रेडिओ क्लब जेट्टीमुळे प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळणार

मुंबई: गेटवे ऑफ इंडिया येथील पर्यटकांची वाढती गर्दी आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी 'रेडिओ क्लब जेट्टी' विकसित करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि शिस्तबद्ध सुविधा देण्यास आमचे प्राधान्य आहे, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.


शिवसेना आमदार अशोक पाटील यांनी गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी क्रमांक ५ आणि रॉयल बॉम्बे यॉट क्लबला दिलेल्या परवानगीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राणे बोलत होते.गेटवे ऑफ इंडिया हा परिसर नौदलाच्या 'हाय सिक्युरिटी झोन'मध्ये येतो. जेट्टी क्रमांक ५ वर होणारी अनियंत्रित गर्दी अपघातांना निमंत्रण देणारी ठरत होती. त्यामुळे मुंबई पोर्ट प्राधिकरणाने सुरक्षेच्या कारणास्तव येथे तरंगता तराफा (फ्लोटिंग पॉन्टून) उभारण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.


यावेळी आमदार पाटील यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टला १७ टक्के आणि खासगी संस्थेला मिळणाऱ्या ८३ टक्के दराबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्री राणे म्हणाले की, "दर ठरवण्याचे अधिकार मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहेत. तरीही, मुंबईचे मूळ भूमीपुत्र असलेल्या कोळी बांधवांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मी स्वतः केंद्रीय शिपिंग मंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून, स्थानिकांना सवलती देण्यापेक्षा त्यांना आधुनिक बोटी उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे."


दरम्यान, आमदार अशोक पाटील यांनी यावेळी गेटवे ऑफ इंडिया येथील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मंत्री नितेश राणे म्हणाले, हे अतिक्रमण नसून, ती छोट्या कंटेनरमधील एक पोलीस चौकी आहे. ती गरजेची आहे. पण, यावर लोकांची अडचण होत असेल, तर त्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत सूचना केली जाईल.


वरुण सरदेसाईंना मावस भावसह निमंत्रण



आमदार वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न उपस्थित केला की, या ५ नंबरच्या जेट्टीवर जर अतिरिक्त दर आकारले जात असतील, तर त्या दर्जाची सुविधा दिली जाते का? त्याला उत्तर देताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्ही रेडिओ क्लब जेट्टी उभारत आहोत. स्वीडनवरून 'कँडेला' नावाची अत्याधुनिक बोट लवकरच मुंबईत येत आहे. ती आली की माझा पहिला फोन वरुण सरदेसाईंना असेल. तुम्ही माझ्यासोबत त्या बोटीने फिरायला या. वाटल्यास सोबत तुमच्या 'मावस भावाला' (आदित्य ठाकरे) देखील घेऊन या. तुम्हाला 'मातोश्री'चा कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी मी घेईन," असा खोचक टोला राणे यांनी लगावला. राणे यांच्या या विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

Comments
Add Comment

Ashok Kharat : 18 गंभीर गुन्ह्यांच्या फेऱ्यात अशोक खरात, 31 ऑगस्टला पुढील सुनावणी

Ashok Kharat : दैवी शक्ती, मंत्र-तंत्र आणि भविष्याची भीती दाखवून महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Rishabh Pant New Record : षटकारांचं शतक तेही सर्वात जलद! रिषभ पंतने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

गॉल : भारताचा स्टार विकेटकीपर-बॅटर रिषभ पंतने (Rishabh Pant) श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इतिहास