मंत्री नितेश राणे यांच्या 'व्हिजन'वर विधिमंडळात कौतुकाची मोहोर

मुंबई: कोकणच्या निसर्गसंपदेला आधुनिकतेची जोड देऊन या भूमीचा कायापालट करण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राबविलेल्या कार्यपद्धतीचे जाहीर कौतुक बुधवारी विधिमंडळात झाले. कोकणच्या प्रश्नांवर झालेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी अल्पावधीत घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या त्यांच्या 'धडाक्या'चे आमदारांनी मुक्तकंठाने कौतुक केले.


या चर्चेत सहभागी होताना आमदार संजय केळकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीचा गौरव केला. ते म्हणाले की, "कोकणात पर्यटनाच्या अथांग संधी आहेत. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी कोकण विकासाचे जे स्वप्न पाहिले, तेच व्हिजन पुढे नेत मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणासाठी योजनांची भक्कम पायाभरणी केली आहे. विशेषतः मच्छीमारांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि जलवाहतूक सक्षम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सातत्यपूर्ण आहेत. जलवाहतुकीच्या क्षेत्रात सुरू असलेले वेगाचे काम कोकणच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


आमदार शेखर निकम यांनी नितेश राणे यांच्या कार्यतत्परतेचे विशेष अभिनंदन केले. मंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच राणे यांनी मच्छीमारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, पर्ससीन बोटींचा वाद आणि जेट्टींच्या रखडलेल्या कामांना गती दिल्याचे निकम यांनी नमूद केले. "रोपॅक्सच्या माध्यमातून अत्याधुनिक जलवाहतूक सुरू करून त्यांनी कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवली आहे," असेही ते म्हणाले.



'नॅशनल वॉटर वे - २८'ला चालना देण्याची मागणी



यावेळी आ. निकम यांनी एक महत्त्वाची सूचनाही मांडली. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या दाभोळ ते पेडे गोळकोट (नॅशनल वॉटर वे - २८) या मार्गाला गती दिल्यास रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल. ट्रकची वाहतूक बोटीमार्गे होऊन ते थेट लोटे औद्योगिक क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Comments
Add Comment

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावरील L&T फाट्यावर कंटेनर पलटी, वाहतुकीवर परिणाम

Nashik : सिन्नर-नाशिक महामार्गावर (Sinnar-Nashik Highway) एमआयडीसीमध्ये जाण्यासाठी असलेल्या L&T फाटा येथे आज भलामोठा कंटेनर वळण घेत

Nashik : अवघ्या काही तासांत पिंपळगाव कडवा कॅनलजवळ पुन्हा दुसरा अपघात; सिन्नर तालुक्यात खळबळ

Nashik : सिन्नर तालुक्यातील पांचाळे–सोमठाणे रस्त्यावरील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ आज पहाटे सुमारे ६ वाजता भीषण अपघात

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Pizza company gets fine : १० इंचाच्या ऐवजी मिळाला ७ इंचाचा पिझ्झा; ग्राहक आयोगाचा दणका, कंपनीला भरावा लागला मोठा दंड!

आजकाल ऑनलाइन जेवण मागवणे जितके सोपे झाले आहे, तितकेच त्यात फसवणुकीचे प्रकारही वाढले आह

Nashik : सिन्नर तालुक्यातील पिंपळगाव कडवा कॅनलजवळ भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. पांचाळे–सोमठाणे रस्त्यावर पिंपळगाव कडवा

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर