७/११ मुंबई साखळी बॉम्बस्फोट : मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील ११ आरोपींची निर्दोष मुक्तता

मुंबई : मुंबईला हादरवून सोडणाऱ्या २००६ च्या ७/११ साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींच्या अपीलवर आणि फाशीच्या शिक्षेच्या पुष्टीकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.


मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात १८९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ८२७ जण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व ११ आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, मुंबईतील लोकल ट्रेन्समध्ये ११ मिनिटांत ५ ठिकाणी स्फोट झाले होते. चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे स्फोट झाले होते. या स्फोटांसाठी कुकर बॉम्बचा वापर करण्यात होता. मात्र, पोलीस आणि तपास यंत्रणांना याप्रकरणात न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे ११ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.


निकालात नेमकं काय म्हटलंय?


मुंबईत ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याप्रकरणी २०१५ मध्ये सत्र न्यायालयाने १३ आरोपींपैकी १२ जणांना दोषी ठरवले होते. यात ५ जणांना फाशीची शिक्षा तर उर्वरित ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यानंतर याप्रकरणी दोषींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या ६ महिन्यांपासून यावर सुनावणी सुरू होती.

 

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील आतापर्यंतचे अपडेट्स



  • जुलै २००६ रोजी ७ लोकल ट्रेनमध्ये बाँबस्फोट

  • बाँबस्फोटात १८९ जणांचा मृत्यू, ८२७हून अधिक जखमी

  • बाँब असलेले प्रेशर कुकर लोकल ट्रेनमध्ये ठेवून स्फोट झालेला

  • खार रोड-सांताक्रूझमधल्या स्फोटात ७ तर,बांद्रा-खार रोडच्या स्फोटात २२ जण ठार

  • जोगेश्वरीच्या स्फोटात २८, माहिम जंक्शनला ४३, मीरा रोड-भायंदरमध्ये ३१ ठार

  • माटुंगा रोड-माहिम दरम्यानच्या स्फोटात २८ आणि बोरिवलीमध्ये झाले स्फोट

  • इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी घडवले होते बाँबस्फोट

  • मकोका कोर्टाकडून सप्टेंबर २०१५ ला १२ जण दोषी, ५ आरोपींना फाशी, ७ आरोपींना जन्मठेप

  • फैजल शेख, असिफ खान, कमाल अन्सारी, एहतेशाम सिद्दीकी, नाविद खान यांना फाशीची शिक्षा

  • मकोका कोर्टानं सुनावलेल्या फाशीच्या मंजुरीसाठी सरकारची उच्च न्यायालयात याचिका

  • २१ जुलै २०२५ रोजी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील ११ आरोपींची निर्दोष सुटका

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या