केरळच्या महिलेचा UAE मध्ये संशयास्पद मृत्यू : हुंड्यासाठी बळी घेतल्याचा कुटुंबाचा आरोप

UAE : केरळच्या कोल्लम येथील २९ वर्षीय महिलेचा मृतदेह संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये शारजाह येथील अपार्टमेंटमध्ये आढळला आहे . तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे . अथुल्याच्या आईने आरोप केला आहे की तिचा पती हुंड्यासाठी तिचा छळ करत होता , २ दिवसांपूर्वी सतीशने अथुल्याचा गळा आवळला, तिच्या पोटात लाथा मारल्या आणि तिच्या डोक्यात देखील मारले, अथुल्याच्या कुटुंबाने केलेल्या आरोपानंतर कोल्लम पोलिसांनी तिच्या पतीविरोधात हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे .


मृत अथुल्या शेखर हिचा विवाह २०१४ मध्ये कोल्लम येथील रहिवासी असलेल्या सतीशशी झाला होता . तिच्या कुटुंबाने लग्नाच्या वेळी सतीशला ४० तोळे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी दिल्याची माहिती समोर आलीय . परंतु त्याने ते पुरेसे नसल्याचे सांगितले आणि तिच्याकडून आणखी हुंडा मिळावा यासाठी तो अथुल्याला त्रास देत असे . १९ जुलै रोजी सकाळी तिचा मृतदेह शारजाह येथील तिच्या फ्लॅटमध्ये आढळला. घरात मल्याळममध्ये लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे, जी मृत अथुल्याने लिहिली असल्याचे समजतंय . यात तिने म्हटले आहे की तिचा पती आणि सासरचे लोक हुंड्याच्या मागणीवरून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.


अथुल्याचे वडील राजशेखरन यांनी "माझी मुलगी आत्महत्या करेल असे मला वाटत नाही. तिचे तिच्या मुलीवर खूप प्रेम आहे. तिचा खून झाला आहे," असे सांगितले. त्यांनी दावा केला की तिचा नवरा मद्यपी आहे आणि नेहमीच तो तिला मारहाण करायचा .


"तिला दररोज होणाऱ्या सर्व छळाला ती सहन करत होती. तिने तिच्या मुलीसाठी हे सर्व सहन केले. यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या. पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेमके काय घडले हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे," असंही ते म्हणाले.


तिच्या कुटुंबाने व्हिडिओ देखील दाखवले आहेत ज्यात अथुल्याला जखमांच्या खुणा दिसत आहेत आणि तिचा नवरा तिला मारहाण करण्यासाठी स्टूल उचलताना दिसत आहे.


थेक्कुंभगम पोलिसांनी सतीशविरुद्ध कलम ८५, ११५(२), ११८(१), १०३(१) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ च्या कलम ४ आणि ३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Comments

Manisha    July 22, 2025 08:29 AM

Parents also responsible because why u prestressed ur daughter to live with stupid husband till her death

Add Comment

Russia Ukraine War : इराण-अमेरिका संघर्षाच्या छायेत रशियाचा महाविनाशक प्रहार, युक्रेनवर ३ टनांच्या FAB-३००० ग्लाईड बॉम्बचा हल्ला

रशिया : रशिया-युक्रेन युद्धाने आता अधिक भीषण आणि रक्तरंजित वळण घेतले आहे. युक्रेनकडून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना

Balochistan : मोठी बातमी! लष्कराच्या नाकावर टिच्चून बलुचिस्तानची स्वातंत्र्याची घोषणा; 85 टक्के भूभागावर ताबा मिळवल्याचा दावा

सध्या इंटरनेटवर 'रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान' (Republic of Balochistan) या नावाने एक अधिकृत पत्र आणि निवेदन प्रचंड व्हायरल होत आहे. या

Iran Missile Attack on UAE Oil Tanker : होर्मुझमध्ये तणावाचा स्फोट! UAEच्या दोन तेलवाहू जहाजांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय खलाशी ठार, ८ जण जखमी

होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) दोन तेलवाहू

Donald Trump : "आम्हीच होर्मुझचे रक्षक असल्याने आता आम्ही २०% सुरक्षा शुल्क आकारणार"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठी घोषणा करत जागतिक

Accident : व्हिएतनाम बोट दुर्घटना; १५ भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज रात्री मुंबईत दाखल होणार

मुंबई: व्हिएतनाममधील फूक्वॉक बेटाजवळ झालेल्या भीषण स्पीडबोट अपघातात जीव गमावलेल्या १५ भारतीय पर्यटकांचे

Massive Fire in Bangkok Bar : भर पार्टीत बारला भीषण आग; २७ जणांचा होरपळून मृत्यू, तर ६० हून अधिक जखमी

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक रविवारी रात्री एका भयंकर दुर्घटनेने हादरून गेली. वीकेंडच्या पार्टीसाठी एका