रेल्वे आणि म्हाडा हद्दीतच वाढतात अनधिकृत बांधकामे; मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांवरील कारवाईला जबाबदार कोण?

मुंबई : मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाईत म्हाडा आणि रेल्वेच्या जागांवरील झोपड्यांचीच मोठी समस्या आहे. या भागांतील झोपड्यांचे इमले वाढतच जात असून या वाढत्या झोपड्यांवर कारवाई होत नसल्याने महापालिकेला आपल्या हद्दीतच कारवाई करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारवाईला गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रेल्वे आणि म्हाडासह इतर प्राधिकरणांच्या जागांवरील अतिक्रमित आणि अनधिकृत बांधकांमावर बोट दाखवून कारवाईला विरोध केला जात असल्याचे बोलले जात आहे.


नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये यापुढे मुंबईसह इतर शहरांमध्ये अनधिकृत बांधकाम होणार नाही. आता या अनधिकृत बांधकामांना फुलस्टॉप लागलाच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.



मुंबईत रेल्वेच्या हद्दीमध्ये तसेच म्हाडाच्या आणि मुंबई पोर्ट ट्रस्टसह इतर मालकीच्या जमिनींवर वसलेल्या झोपड्यांवर कारवाईची जबाबदारी ही संबंधित प्राधिकरणाची असते. परंतु, म्हाडा किंवा रेल्वे यासारख्या संबंधित प्राधिकरणाकडून वेळेत कारवाई होत नाही. परिणामी कच्ची बांधलेली झोपडी पुढे पक्की होते, मग त्यावर पोटमाळा चढवला जातो, या पोटमाळ्यावर आणखी एक एक माळा अशाप्रकारे माळ्यांवर माळे चढवले जात आहे. वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील गरीब नवाज नगर असो वा दहिसर असा वा मालाड वा माहिम, वडाळा, कुर्ला तसेच पुढे प्रत्येक स्थानकांच्या जवळ झोपड्यांवर कारवाई न झाल्याने आता याठिकाणी झोपड्यांचे टॉवर तयार झाले आहे. तर बेहराम पाडा, भारत नगर आदींसह अनेक म्हाडाच्या जागांवर झोपड्यांचे अतिक्रमण झाले असून या वाढत्या अतिक्रमणांनंतरही म्हाडाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या जागांवर झोपड्यांचे टॉवर तयार होत आहे.


मुंबईतील काही जाणकारांच्या मते, एका बाजुला महापालिका प्रशासन आपल्या हद्दीतील झोपड्यांवर कारवाई करायला जातात, तेव्हा राजकीय पक्षांकडून म्हाडा आणि रेल्वेच्या जागांवर वाढणाऱ्या आणि मजल्यांवर मजले चढवले जात असतानाही त्यावर कारवाई होत नाही. आमच्या झोपडयांवर कारवाई कसे करतात असा सवाल करत विरोध केला जातो. म्हाडा आणि रेल्वेच्या बहुतांशी जागांवर मुस्लिम आणि परप्रांतियांकडून झोपड्यांची उंची वाढवली जात आहे. यामध्ये बहुतांशी मुस्लिम वस्तींमध्येच अतिक्रमण करून झोपड्या वाढवल्या जात असताना संबंधित प्राधिकरणांकडून त्यावर कारवाई केली जात नसल्याने महापालिकेला आपल्या हद्दीतील अतिक्रमणांवर कारवाई करणे अडचणींचे ठरत आहे. त्यामुळे महापालिकेला मुंबईत अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी म्हाडासह रेल्वेच्या हद्दीतील झोपड्यांवर कारवाई करणे तसेच अतिक्रमणांवर कारवाई करणे ही अत्यंत आवश्यक बाब मानली जात आहे.आज महापालिकेसह रेल्वे आणि म्हाडा या सरकारी यंत्रणा केवळ नोटिसा पाठवण्याचे काम करतात, परंतु प्रत्यक्ष तोडकामाला टाळाटाळ करतात, अशी वस्तुस्थिती आहे. मुंबईला अनधिकृत बांधकामांपासून मुक्त करण्यासाठी प्रशासनाला सर्व प्राधिकरणांशी समन्वय साधून कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर