मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना ३५ लाख घरे उपलब्ध करणार- उपमुख्यमंत्री

मुंबई: उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज कडक शब्दांत समाचार घेतला. गोरेगाव मधील नेस्को येथे “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेले विशेष शिबिरात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, नेते रामदास कदम, खासदार रवींद्र वायकर, प्रवक्ते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, रामदास कदम मला माहित आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. निवडणुका येतात आणि जातात पण त्यांनी लक्षात ठेवावे, ज्यांचं घर काचेचं असतं, त्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा त्यांनी यावेळी आरोप करणाऱ्यांना दिला. त्यांच्या पोटात दुखते कारण त्यांनी इतकी वर्ष मराठी माणसांसाठी काही केलं नाही. आपल्या सरकारने मुंबईतील रस्ते काँक्रिटचे केले आहेत. येत्या अडीच वर्षांत संपूर्ण मुंबईचे रस्ते काँक्रिटचे होतील. रस्त्यांचे रिपेअरिंग होणार नाही, त्यामुळे त्यांचा पैसा बंद होईल अशी टीका त्यांनी उबाठावर केली. मराठी माणसासाठी त्यांनी काहीच केलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की ४० लाख घरे मराठी माणसाला मिळायला हवीत. आम्ही हे स्वप्न पुढे नेत आहोत. ३५ लाख घरे उभारण्याचे काम सुरू केले आहे. मराठी माणसाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे. जे मराठी लोक मुंबईबाहेर गेले, त्यांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण प्रत्येकाच्या हातात तो देण्याची माझी इच्छा आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सिद्धेश कदम, योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या कामाचं कौतुक करताना सांगितले की, येथे उपस्थित नेते हे शाखाप्रमुख राहिले आहेत. शाखा हे न्यायाचे मंदिर आहे. शिवसैनिक वर्षानुवर्षे तिथे जनतेसाठी काम करत आले आहेत. लोकांचा विश्वास आहे की, आपल्याला तिथे न्याय मिळतो. मी देखील जनतेच्या सेवा कार्यातून आणि शाखेतील कामगिरीमधूनच मुख्यमंत्री झालो आणि सत्तेतील माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आजही तीच दिशा पुढे नेण्याचे काम चालू आहे. आपण अनेक योजना सुरू केल्या. यात लाडकी बहिण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकरी योजना – या सर्व योजनांचा लाभ लोकांना होत आहे. लाडकी बहिण योजनेमुळे अडीच कोटी बहिणींना फायदा झाला असून मी त्यांचा लाडका भाऊ झालो आहे. जिथे जिथे जातो तिथे त्यांच्या प्रेमाचा मान मला मिळतो. लाडकी बहिण योजनेचा अनेकांनी विरोध केला होता, पण आम्ही ती सुरू केली आणि त्याचा थेट फायदा आमच्या बहिणींना झाला. ही योजना एक गेम चेंजर ठरली आणि त्यामुळंच आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला असे ते म्हणाले.


शासन आपल्या दारी उपक्रमातून राज्यातील पाच कोटी नागरिकांना थेट लाभ मिळाला असे प्रतिपादन केले. या शिबिरात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आली. या शिबिराचा मुख्य उद्देश हा शासकीय सेवा आणि योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे, जेणेकरून नागरिकांना वेळेवर योजनांचा लाभ घेता येईल.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , पूर्वी नागरिकांना कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेरे मारावे लागत होते, तरीसुद्धा त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नव्हते. पण आता सरकार थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्यामुळे लोकांना मोठा फायदा होत आहे. आजपर्यंत सुमारे ५ कोटी नागरिक या उपक्रमाचे लाभार्थी झाले आहेत आणि ही संख्या अजून वाढणार आहे. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना प्रेरणा मिळते आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून आपले भविष्य घडवण्याची संधी मिळते असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

दसऱ्याच्या मुहूर्तावर ठाण्यात वाहन खरेदीचा उत्साह, आरटीओमध्ये ४ हजार २२६ वाहनांची नोंदणी

caठाणे (वार्ताहर) : शहरभर नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने धाव

गणपतीपुळे संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी ४२ लाखाची मदत

रत्नागिरी : श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थानकडून मराठवाड्यातील महापुरातील नुकसानग्रस्तांकरिता ४२ लाखाची मदत

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव