तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन केली आत्महत्या

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर अली आहे . तीन मुलांसह आई वडिलांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे . ही सामूहिक आत्महत्येची घटना आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. विपुल वाघेला (३२), त्यांची पत्नी सोनल (२६) आणि त्यांची मुले करीना (११), मयूर (८) आणि राजकुमारी (५) अशी या मृतांची नावे आहेत .


विपुल वाघेला आणि त्याचं संपूर्ण कुटुंब आज सकाळी त्यांच्या अहमदाबादमधील घरात मृतावस्थेत आढळलं. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली . पोलिसांनी या पाचही जणांना रुग्णालयात नेलं . पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत . या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तसंच शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे हे घडल्याचं बोललं जातं आहे .



गेल्या काही दिवसांपासून वाघेला कुटुंबाला आर्थिक अडचणी जाणवत होत्या. बंगोडारा या ठिकाणी ते भाडे तत्त्वावर असलेल्या घरात राहात होते. विपुल वाघेला रिक्षा चालक होते आणि त्यांच्या घरात कमाई करणारे ते एकटेच होते. विपुलने कर्ज काढून रिक्षा विकत घेतली होती. आर्थिक अडचणी भासत असल्याने विपुल आणि त्याची पत्नी कायमच तणावात असायचे. बहुदा याच कारणामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे .

Comments
Add Comment

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी

गोखले बिल्डर्सच्या कंपन्यांमधून बाहेर पडल्याची कागदपत्रे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, मुरलीधर मोहोळ यांचे स्पष्टीकरण

पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीनीच्या व्यवहारावरून केंद्रीय राज्यमंत्री तथा भारतीय

अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण

घोडबंदर रोडवर भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू, दुचाकीचालक गंभीर जखमी

ठाणे : घोडबंदर वाहिनीवरील विजय गार्डन स्काय वॉक ब्रिजखाली, रविवार रात्री

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष