आंतरराष्ट्रीय व्यासपीठांद्वारे मसूद अझहरला भारताकडे सोपवण्याची मागणी, पण...
जम्मू काश्मीर: जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात लपला असल्याची मोठी माहिती भारताच्या गुप्तचर संस्थेला मिळाली आहे. त्यामुळे पाकड्या सुधारणा करत असल्याचं कितीही आव आणत असला तरी, त्याचा खोटेपणाचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे.
ओपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान भारताने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांना नामशेष केले होते. ज्यात मसूद अझहरच्या कुटुंबाचे अनेक लोकं मारली गेली होती, पण मसूद अझहर मारला गेला नव्हता. भारतातील अनेक अतिरेकी कारवाईचा प्रमुख सूत्रधार असलेला मसूद भारतीय लष्कराच्या आजही रडारवर आहे, मात्र पाकिस्तानमुळे तो आजही जिवंत आहे. असा हा दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जुन्या बालेकिल्ल्या बहावलपूरपासून सुमारे १००० किमी अंतरावर असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
बहावलपूर पीओकेमध्ये उघडपणे फिरताना दिसला अझहर
यापूर्वी, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले होते की अझहर अफगाणिस्तानात असू शकतो. ते म्हणाले होते, "जर भारत सरकारने तो पाकिस्तानात असल्याची माहिती दिली तर आम्ही त्याला अटक करण्यास तयार आहोत." परंतु आता समोर आलेली नवीन माहिती या दाव्याला कमकुवत करते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा सिद्ध करते.
पठाणकोट आणि पुलवामा हल्ल्यांचा मास्टरमाइंड
दहशतवादी मसूद अझहर हा २०१६ च्या पठाणकोट एअरबेस हल्ल्याचा आणि २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचे मानले जाते, ज्यामध्ये ४० हून अधिक सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भारताकडे त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे आहेत आणि संयुक्त राष्ट्रांनी त्याला आधीच आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.
जैश-ए-मोहम्मद दिशाभूल करीत आहे
दरम्यान, जैश-ए-मोहम्मदचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म मसूद अझहर अजूनही बहावलपूरमध्ये आहे हे दाखवण्यासाठी त्याचे जुने ऑडिओ संदेश सतत रिप्ले करत आहेत, परंतु गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की हे दावे दिशाभूल करणारे आहेत.
गिलगिट-बाल्टिस्तान महत्त्वाचे का आहे?
गिलगिट-बाल्टिस्तान हा एक असा प्रदेश आहे जो धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) देखील येथून जातो. अशा परिस्थितीत, मसूद अझहरची उपस्थिती या प्रदेशाला अधिक अस्थिर बनवू शकते.
भारत-पाकिस्तान संबंधांवर परिणाम होऊ शकतो?
जर मसूद अझहरच्या उपस्थितीची पुष्टी झाली तर ते पाकिस्तान करत असलेल्या दहशतवादविरोधी खोटे दावे उघड करू शकते. भारताने आधीच अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानला या दहशतवाद्याला सोपवण्याची मागणी केली आहे. आता या नवीन ठिकाणाच्या खुलाशानंतर पाकिस्तानवरील दबाव आणखी वाढू शकतो.
पुढील रणनीती काय असेल?
भारतीय गुप्तचर संस्था आता त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच, पाकिस्तान त्याला अटक करण्यासाठी खरोखरच पावले उचलेल की पुन्हा एकदा सबबी सांगण्याचा प्रयत्न करेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.