असल्फा देवराळ परिसरात पाण्याची समस्या जटिल

  37

मुंबई : असल्फा परिसरात दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा संपूर्ण भाग देवराळ परिसरातून पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन माजी नगरसेवक किरण लांडगे, विजयेन्द्र शिंदे व ईश्वर तायडे यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगर जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्या दालनात बैठक पार पडली.


यावेळी साने गुरुजी नगर, लालबत्ती, हनुमान टेकडी, नारायण नगर, मराठवाडा चाळ, दत्त मंदिर परिसर, ओम साई धाम सोसायटी, वीर बजरंग क्रीडा मंडळ, भिम नगर, छत्रपती शिवाजी नगर, नवलादेवी मित्र मंडळ या भागातील पाणी प्रश्नाबाबत असलेल्या वेगवेगळ्या अडचणी सोडवण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने पाण्याचा प्रेशर वाढविणे, अधिक क्षमतेचा पाणीपुरवठा पंप बसविणे, पाण्याची टाकी स्वच्छ करणे, टाकीची संरक्षण भिंत बांधणे, तसेच नवीन पाण्याची लाइन टाकणे इत्यादी कामांचा समावेश करण्यात आला आहे.




हा सर्व परिसर डोंगराळ भाग असून पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या करिता मोर्चा, आंदोलने या माध्यमातून अनेक वेळा लढा दिला असून जनतेच्या हक्काचे पाणी त्यांना मिळून देणारच
- किरण लांडगे, ( माजी नगरसेवक )


Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई