पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, ८ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

  96

मुंबई : गोंधळ, गदारोळ, सभात्याग, सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, हाणामारी या आणि अशा विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आज सूप वाजले. आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार, 8 डिसेंबर रोजी नागपुरात होणार आहे, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.


राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना हिवाळी अधिवेशनाच्या तारखेबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच राज्यपालांनी दिलेल्या संदेशानुसार पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली.


अधिवेशनात झालेल्या कामकाजाचा आढावा सांगताना ते म्हणाले, या काळात एकूण 15 बैठका झाल्या आणि एकुण 133 तास 48 मिनिचे कामकाज झाले, तर 45 मिनिटे वेळ वाया गेली. यात दिवसाचे सरासरी कामकाज 8 तास 55 मिनिटे झाले. यामध्ये एक अभिनंदन प्रस्ताव, सात शोक प्रस्ताव, 8277 तारांकित प्रश्न, स्विकृत प्रश्न 579, उत्तरित झालेले प्रश्न 92, प्राप्त सूचना 8, अस्विकृत सूचना 8, चर्चा 7, सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर प्राप्त सूचना 181, मान्य सूचना 42, त्यातील केवळ पाच विषयांवर चर्चा झाली. विधानसभेत १४ शासकीय विधेयके सादर झाली. १५ विधेयकांवर सहमती झाली, तर एक मागे घेण्यात आले. आमदारांकडून २४८१ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या, त्यातील 511 स्विकृत सूचना करून १५२ सूचनांवर प्रत्यक्ष चर्चा झाली.

Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली