सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराची मुभा कर्मचाऱ्यांना

मुंबई : मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजनांचा विचार केला जात असतानाच सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिराने येण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली. त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना वाढीव अर्धा तास काम करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणाचे पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. आमदार अतुल भातखळकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडली. त्यावर उत्तर देताना प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. 'मुंबई रेल्वे वाहतुकीवरील ताण वाढता आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आज लोकल पकडण्यासाठी रेल्वे प्रवासी जीव धोक्यात घालत आहेत. त्यातूनच मुंब्रा अपघातासारखी घटना घडली. प्राप्त



राज्य सरकारची विधानसभेत माहिती


'खासगी' कर्मचाऱ्यांच्या वेळेबाबत 'टास्क फोर्स'


'खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांच्या वेळेत करण्यासंदर्भात लवकरच 'टास्क फोर्स' तयार केले जाणार आहे,' अशी घोषणाही सरनाईक यांनी विधानसभेत केली. बदल आकडेवारीनुसार, मुंबईत विविध रेल्वे अपघातांत ७ हजार ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाला. सुमारे ७ हजार २०० प्रवासी जखमी झाले असून ही बाब भूषणावह नाही. त्यामुळे या घटना कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो रेल्वेशिवाय इतर वाहतूक पर्यायांचा वापर करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे,' असे सरनाईक यांनी यावेळी नमूद केले.



बंद दरवाजांच्या रेल्वेसंख्येत वाढ ?


'एसी लोकल आणि सामान्य लोकलचे तिकिटाच्या दरात तफावत आहे. त्यात सुसूत्रता आणून जास्तीत जास्त बंद दरवाजांच्या रेल्वेच्या संख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करत आहेत,' अशी माहितीही सरनाईक यांनी सभागृहात दिली. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



पॉट टॅक्सी आणि जलवाहतुकीचा विचार


'राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी सरकारने जलवाहतूक, पॉट टॅक्सी आणि रोप वे यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणार आहे,' अशी माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली.

Comments
Add Comment

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.