मुंबई : गोविंदांना शासनाकडून मिळणाऱ्या विमा कवचात वाढ करुन ते दिडलाख गोविंदांना देण्यात यावे अशी मागणी करीत आज दहिहंडी समन्वय समितीने मंत्री एँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
महाराष्ट्र शासनाने दहीहंडी या खेळाला साहसी दर्जा दिल्यापासून दहीहंडीच्या या खेळामध्ये अनेक गोविंदांचा सहभाग वाढला आहे व त्याच बरोबर खेळात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा धोकाही वाढलेला आहे. यास्तव महाराष्ट्र शासनाने मागील दोन वर्षापासून ७५,००० गोविंदांसाठी विमा कवच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी या वर्षी यामध्ये वाढ करुन १,५०,००० गोविंदांना विमा कवच मिळावे अशी मागणी करीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. याबाबत क्रिडा विभागाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
मुंबई : विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद ...
शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मंत्री आशिष शेलार यांनी त्यांचे आभार मानले आहे. एका गोविंदाला दुर्दैवाने मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, अपघातग्रस्त असेल तर ५ लाख, अडिचलाख किंवा किरकोळ जखमी असेल तर १ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.