पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैन्य जवानाला अटक

चंदीगड : पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेन्स (आयएसआय) साठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय सैन्यातील जवानाला अटक करण्यात आली आहे. आरोपी जवानाचे नाव देविंदर सिगं असून तो संगरूर जिल्ह्यातील निहालगडचा रहिवासी आहे. पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने त्याला जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथून १४ जुलै रोजी अटक केली आहे.


यासंदर्भात पंजाब पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार हेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या माजी सैनिक गुरप्रीत सिंग उर्फ गुरी याच्या अटकेनंतर देविंदरला अटक करण्यात आली आहे. गुरप्रीत सिंगच्या चौकशीत असे आढळले की देविंदर फिरोजपूर तुरुंगात असताना लष्कराचे संवेदनशील कागदपत्रे मिळवण्यात त्याचा सहभागी होता. यातील गोपनिय माहिती त्याने आयएसआयला दिल्याचा आरोप आहे. देविंदर सिंगच्या अटकेनंतर, अधिकाऱ्यांनी त्याला १५ जुलै रोजी मोहाली न्यायालयात हजर केले.


न्यायालयाने आरोपीला अधिक चौकशीसाठी सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की देविंदर आणि गुरप्रीत यांची पहिली भेट २०१७ मध्ये पुण्यातील एका लष्करी छावणीत प्रशिक्षणादरम्यान झाली होती. त्यानंतर, दोघेही संपर्कात राहिले आणि नंतर त्यांना सिक्कीम आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले. भारतीय सैन्यात असताना, दोघांनाही गोपनीय लष्करी साहित्य उपलब्ध होते, ज्यापैकी काही गुरप्रीतने लीक केल्याचा आरोप आहे. हेरगिरी नेटवर्कमधील देविंदरची नेमकी भूमिका अद्याप तपासाधीन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना