आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या वीज प्रश्नांची ऊर्जा विभागाकडून गांभीर्याने दखल

वीज समस्यांवर उपाययोजना राबवण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश


ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बोलावली उच्चस्तरीय आढावा बैठक


मालवण : आमदार निलेश राणे यांची विधिमंडळातील दमदार कामगिरी महाराष्ट्र अनुभवत असताना त्यांच्या मागण्यांची दखल विधिमंडळ व मंत्रालय स्तरावर तत्काळ घेतली जात आहे. पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी वीज समस्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याची गांभीर्याने तत्काळ दखल घेत चालू अधिवेशनातच ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बैठक बोलावली. त्यांनी या बैठकीत महत्त्वाचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. हे सर्व पाहता मालवण-कुडाळला निश्चितच हक्काचे नेतृत्व मिळाले आहे. जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचत आहे. जनतेला न्याय मिळत आहे. अशा भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.


महाराष्ट्र विधिमंडळच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी संपूर्ण आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मांडणी करताना सभागृहात वीज प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची ऊर्जा विभागाने गांभीर्याने दखल घेतली. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली होती.


या बैठकीत वीज समस्यांबाबत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार महेंद्र दळवी, शेखर निकम, प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, ऊर्जा विभागाचे सचिव लोकेशचंद्र तसेच ऊर्जा विभागाचे अधिकारी वर्ग
उपस्थित होते.

Comments
Add Comment

सिंधुदुर्गचे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास, पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

सिंधुदुर्ग : देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणाली स्वीकारणारा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला

सावंतवाडी, रत्नागिरी, संगमेश्वर स्थानकांत रो-रो सेवेला थांबा

रेल्वेतून एकावेळी ४० कारची क्षमता सिंधुदुर्ग  : मुंबईतून कोकणात पोहोचण्यासाठी रस्तेमार्गे १० ते १३ तासांचा

शेतकऱ्यांची दिवाळी गोड; आंबा-काजू नुकसान भरपाईपोटी ९० कोटी विमा रक्कम वाटप सुरू

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होणार - पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांची सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व