Plastic Flower Ban: यंदाच्या गणेशोत्सव सजावटीमध्ये प्लॅस्टिक फुलांना बंदी, मुख्यमंत्र्यांची संमती, लवकरच निर्णय

प्लॅस्टिक फुलांचा वापर बंद करण्याबाबत आमदार रोहित पाटील यांच्या निवेदनाला मुख्यमंत्रांकडून मान्यता


मुंबई : लवकरच श्रावण महिना सुरु होणार असून त्यांनतर गणेशोत्सव, दिवाळी, दसरा असे सण एकामागून एक साजरी केली जातील. या सणासुदीत तसेच, विविध उत्सवाच्या सजावटीसाठी बाजारात येणाऱ्या प्लॅस्टिक फुलांना प्रचंड मागणी आहे. ज्यामुळे नैसर्गिक फुलांचा वापर कमी होऊ लागल्यामुळे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे, कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आमदार रोहित पाटील (Rohit patil) यांनी निवेदनाद्वारे केली.


याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान मंत्री गोगवले यांनी देखील शासन कृत्रिम फुलांवर लवकरच बंदी आणेल, असे म्हटले आहे.



१०५ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र


रोहित पाटील यांनी प्लॅस्टिक फुलावर बंदी घालण्याच्या केलेल्या या मागणीला विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल 105 आमदारांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे. ही महत्त्वाची बाब आमदार रोहित पाटील यांनी लक्षामध्ये आणून दिली.



आ.रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात काय म्हंटले आहे?


राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.



कृत्रिम फुलांवर बंदी आणणार


त्यामुळे शासन कृत्रिम फुलांवर लवकरच बंदी आणण्याची शक्यता असून, यंदाचा गणेशोत्सव तसेच त्यानंतर येणारे सर्व सण पर्यावरणयुक्त करण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरणार आहे. आमदार महेश शिंदे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित करत हा मुद्दा चर्चेला आणला होता. त्यावर, हा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.