ठाकरे गटाला कोकणात धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने ठाकरे गटाला कोकणात जबरदस्त धक्का दिला आहे. आज मालवणमधील ठाकरे गटाचे काही महत्त्वाचे नेते मुंबईतील भाजपच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात भाजपमध्ये सामील झाले. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील मोठे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी महायुतीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना ...
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची यादी
- मंदार केणी – माजी नगराध्यक्ष
- यतीन खोत – माजी नगरसेवक, बांधकाम सभापती
- दर्शना कासवकर – माजी नगरसेविका, आरोग्य सभापती
- भाई कासवकर – शाखा प्रमुख
- नंदा सारंग – महिला उपशहर प्रमुख
- नितीन पवार – शाखा प्रमुख
- सई वाघ – शाखा प्रमुख
- अमन घोडावले – उपशाखा प्रमुख
- संजय कासवकर – शाखा प्रमुख
- सेजल परब – माजी नगरसेविका
यावेळी पक्षप्रवेशानंतर बोलताना माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांनी रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले. “खऱ्या अर्थाने अडीच वर्षांत रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. त्याठिकाणी जे काम त्यांनी केले, त्यामध्ये आम्हाला कधीच विरोधी पक्षाची वागणूक दिली नाही. मालवण शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्याचा आताही विकास होईल असा आम्हाला विश्वास आहे. पर्यटनदृष्ट्या आम्हाला मालवणचा विकास व्हावा यासाठीच आज आम्ही भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहोत.”
सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण यांचं कोकणातील राजकारणावर जास्त लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे. सध्या ही योजना यशस्वी होताना दिसत आहे. मालवणमधील या मोठ्या पक्षबदलामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या पक्षप्रवेशाचा ठाकरे गटात काही परिणाम होतो का, हे पाणे महत्त्वाचे ठरणार आहे.