बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळले, पुण्याच्या 'कॅफे गुडलक'ला कुलप लावले

  62

पुणे : पुण्यात १९३५ पासून असलेल्या कॅफे गुडलकचा बनमस्का प्रचंड लोकप्रिय होता. पण एका ग्राहकाने बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याची तक्रार केली तसेच या घटनेचा व्हिडीओ तयार करुन व्हायरल केला. व्हिडीओ व्हायरल होताच अन्न व औषध प्रशासनाने कॅफे गुडलकमधून अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले तसेच काचेच्या तुकड्यांप्रकरणी कॅफे प्रशासनाची चौकशी केली. यानंतर अन्न सुरक्षेसाठी पुरेसे उपाय केलेले नाही, असे कारण देत अन्न व औषध प्रशासनाने कॅफे गुडलकवर कारवाई केली आहे. कॅफे गुडलकचा परवाना रद्द करण्यात आला आहे. परवाना रद्द झाल्यामुळे कॅफे गुडलक बंद करण्यात आले आहे.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोड अर्थात एफसी रोडवर असलेला कॅफे गुडलक अनेक वर्ष तरुणाईचे खाण्यापिण्याचे आणि गप्पा मारण्याचे आवडते ठिकाण म्हणून ओळखले जात होते. याच कॅफेत आकाश जलगी आपल्या पत्नीसोबत चहा आणि बन मस्का घेण्यासाठी गेले होते. त्यांना दिलेल्या बन मस्कामध्ये सुरुवातीला बर्फासारखे काहीतरी दिसले. मात्र, नीट पाहिल्यावर 'बन मस्का'मध्ये बर्फ नसून काचेचे तुकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे आकाश यांचा पारा चढला आणि त्यांनी पत्नीला चहा न पिण्यास सांगितले. यानंतर आकाश यांनी कॅफे व्यवस्थापनाकडे तक्रार केली. कॅफे व्यवस्थापनाने घडलेल्या घटनेसाठी माफी मागितली आणि बिलाचे पैसे घेणार नाही, असेही सांगितले. यानंतर आकाश यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली. काचेचे तुकडे पोटात गेले असते, तर किती मोठा अनर्थ घडला असता ? ही बाब त्यांनी प्रकर्षाने उपस्थित केली. कॅफे व्यवस्थापनाने स्वतःची बाजू मांडताना बन अर्थात विशिष्ट प्रकारचे पाव बाहेरून मागवले जातात आणि पाव तयार करणाऱ्याला घटनेची माहिती दिल्याचे सांगितले.

ऑनलाईन तक्रार मिळताच अन्न व औषध प्रशासनाने कॅफे गुडलकवर नियमानुसा कारवाई केली आहे. कॅफेमध्ये कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची तसेच पिण्याच्या पाण्याच्या तपासणीची कोणतीही नोंद नाही. कॅफेच्या स्वयंपाकघरातील टाइल्स तुटलेल्या होत्या. तेथील कचरापेटी पाण्याने भरुन उघडी पडली होती. अन्न ठेवण्यासाठी वापरला जाणारा फ्रीज वाईट अवस्थेत होता. या स्थितीची दखल घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कॅफे गुडलकमधून अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले. हे नमुने घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षेसाठी पुरेसे उपाय केलेले नाही, असे कारण देत कॅफे गुडलकचा परवाना रद्द केला.
Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल