चौकच्या ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिक्षकांकडून कायापालट

  35

परिसरातील रुग्णांसाठी ठरतेय वरदान


अलिबाग : चौक बाजारपेठ व सभोवतालच्या १८ ते २० वाड्या-वस्त्या आणि आजूबाजूच्या नऊ ते दहा गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले चौकचे ग्रामीण रुग्णालय हे परिसरातील रुग्णांसाठी वरदान ठरते आहे. चौकच्या ग्रामीण रुग्णालयातील पदभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल यांनी स्वीकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे दिसून येते आहे.


मोहोपाडा रसायनीसह खालापूर तालुक्यातील अनेक रुग्णांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळत असून, रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, दंतचिकित्सक आणि इतर कर्मचारी यांच्या उपलब्धतेत वाढ होण्याबरोबरच रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र आहे. बाह्यरुग्ण विभागात दिवसाला किमान १८० ते २००रुग्ण तेथील सेवेचा लाभ घेतात, तसेच ज्या रुग्णांना रुग्णालयात भरतीची आवश्यकता असते, अशांना रुग्णालयात भरती करून पुढील उपचार दिले जातात. अशांची संख्या महिन्याला सरासरी ४५० ते ५०० असते.


आंतर रुग्णांसाठी रुग्णालयात सकस आहार, चहा-नाश्ता, प्युरिफाईड पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डात टीव्ही संच व प्रत्येकाला आयुर्वेदाची माहिती व्हावी यासाठी हर्बल गार्डनही तयार करण्यात आले आहे. आंतर रुग्णांमध्ये प्रसुती महिलांचे प्रमाण देखील वाढल्याचे चित्र असून, सर्व प्रसूत महिलेची व बाळाची बारकाईने या रुग्णालयात सुश्रूषा केली जाते. चौक ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता काळेल या स्वतः बालरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्या उपास्थितीमध्ये लहान मुलांची तपासणी, संगोपन, आहार यावर त्या सल्ला देतात. तसेच रुग्णालयातील विविध विभागांमार्फतही रुग्णांना सेवा देण्यात प्रयोगशाळा विभाग, दल-किरण, नेत्र तपासणी, दंतचिकित्सा, एच.आय.व्ही. तपासणी व समुदेशन आणि राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम पथक यांच्या अंतर्गत खालापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळकरी मुलांचे आरोग्य तपासणी असा करण्यात येते. एखादा अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात भरती केले जाते, तर मृतकांना शवविच्छेदनाचीही या सुविधा आहे.


 
Comments
Add Comment

जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागात मनुष्यबळाचा अभाव

कोट्यवधींचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या मत्स्यविभागाकडे सरकारचे दुर्लक्ष अलिबाग : अलिबाग जवळच्या समुद्रात

प्रवीण ठाकूर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

रायगडमध्ये काँग्रेसला मोठा झटका अलिबाग : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या आगामी निवडणुकांच्या आधी राज्यात

मुरुडच्या काशिद समुद्रकिनारी पंचावन्न लाखाेंचा चरस जप्त

नांदगाव मुरुड : गुप्त बातमीदारामार्फत मुरुड पोलिसांना ३१ जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुरुड तालुक्यातील

एनएमएमटी बस कर्जत पूर्वेकडून सुटण्यास सुरुवात

शहरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार विजय मांडे कर्जत : कर्जत पूर्वेकडील प्रवाशांसाठी आात बसची सुविधा उपलब्ध

पाली शहरात ३५ वर्षांनंतर अजूनही परिस्थिती ‘जैसे थे’

अष्टविनायक तीर्थक्षेत्राला शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा अशी आहे जाहीर सूचना दिनांक ६/२/१९९० सालचे हे

रायगड पोलिसांनी केला ‘डिजीटल अरेस्ट’ रॅकेटचा पर्दाफाश

३५ मोबाईलसह ६१७५ सिमकार्ड जप्त, ११ आरोपींना अटक अलिबाग : वयोवृद्ध नागरिकांना फसवण्यासाठी ‘डिजीटल अरेस्ट’च्या