कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल


महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून, त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठ्या प्रमाणावर जादा बसेसची व्यवस्था केली आहे. महाड आगारातून फक्त महाड–पनवेल या मार्गावर तब्बल ९२ ते ९३ बस सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या अतिरिक्त फेऱ्यांसाठी ग्रामीण भागातील नियमित एसटी सेवा बंद केल्याने महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्याच्या खेडोपाड्यातील प्रवाशांचे हाल झाले आहेत.


महाड, पोलादपूर व गोरेगाव या ठिकाणी खरेदी, शिक्षण तसेच वैद्यकीय उपचारासाठी ग्रामीण भागातील नागरिक दररोज ये-जा करतात. पण सध्या एसटी सेवा बंद असल्याने या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मिनिडोअर किंवा इतर प्रवासी वाहने महाग पडत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसत असून, वेळेचाही अपव्यय होत आहे.


याशिवाय नुकताच लाखपाले–माणगांवदरम्यान झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे मिनिडोअरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनांना वळणावळणाच्या टोळमार्गे जावे लागले आणि परिणामी प्रवासाचा कालावधी तसेच खर्च वाढला. ग्रामीण भागातील फेऱ्या बंद असल्याबाबतचे फलक महाड परिवहन स्थानकात लावण्यात आले असून, यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील एसटी सेवा ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. अशा काळात ती बंद करून जादा बसेस केवळ मुंबई-पुणे मार्गावर सोडल्याने ग्रामीण प्रवाशांना मात्र डोकेदुखी ठरत आहे.

Comments
Add Comment

Virar Alibaug Corridor : विरार-अलिबाग कॉरिडॉर : शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीचे भूसंपादन तातडीने स्थगित करा- आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : विरार-अलिबाग (Virar-Alibuag) बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावर पहिले आंतरराष्ट्रीय मालवाहू विमान

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जागतिक व्यापार आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा

Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळती; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, ३४ कामगारांची तब्येत बिघडली

महाड : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची

NMIA : नवी मुंबई विमानतळामुळे महामुंबईतील कनेक्टिव्हिटी झाली मजबूत

नवी मुंबई विमानतळ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ हवाई वाहतुकीच्या क्षेत्रातच नव्हे, तर

Bharat Gogawale : १५ ऑगस्टला रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार!

- मंत्री भरत गोगावले; येत्या २४ तासांत पालकमंत्री म्हणून घोषणा होणार असल्याचा दावा मुंबई : महायुती सरकारमध्ये

Majha Dusrikade Hay Suru : 'माझं दुसरीकडं हाय सुरू' गाण्यावर रील करणारे ST महामंडळाचे कर्मचारी ३ दिवसांच्या निलंबनानंतर पुन्हा सेवेत, सेवेत येताच केला नवा Video

पनवेल : राज्य परिवहन विभागाच्या गणवेशात वैयक्तिक प्रसिद्धीसाठी रील / शॉर्ट व्हिडीओ करण्यास बंदी आहे. या बंदीचे