रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एक सकारात्मक आणि समाजाभिमुख पाऊल उचलले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पळस्पे फाटा, राहूल हॉटेल परिसर तसेच मुंबई-पुणे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवले. या उपक्रमामुळे वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांना सुरक्षित व वेगवान मार्गक्रमण शक्य झाले आहे.

या कार्याची चाकरमानी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशंसा होत आहे. सणासुदीच्या गर्दीत पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक जाणिव ही "लोकसेवेत पोलीस" हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणारी ठरली आहे.

स्थानिकांनी सांगितले की, "पूर्वी तासन्तास वाहतूक कोंडीत अडकावे लागायचे, आता मात्र प्रवास सुकर झाला आहे. पनवेल पोलिसांचा हा उपक्रम खर्‍या अर्थाने कौतुकास्पद आहे."

हा उपक्रम फक्त वाहतूक सुरळीत करण्यापुरताच मर्यादित न राहता, सार्वजनिक हितासाठी पोलिसांची सामाजिक जबाबदारीही अधोरेखित करतो. इतर भागांतील पोलिसांसाठीही हा एक प्रेरणादायक आदर्श ठरू शकतो.
Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व