लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने चौथ्या दिवसअखेर ४ बाद ५८ धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावात भारताची स्थिती अतिशय खराब दिसत आहेत. भारताने आपले ४ गडी स्वस्तात गमावले आहेत. यशस्वी जायसवाल भोपळा न फोडताच परतला. तर करूण नायर १४ धावांवर बाद झाला.
कर्णधार शुभमन गिलला ६ धावा करता आल्या तर नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीप केवळ १ धाव करून परतला. मैदानावर केएल राहुल खेळत आहे. पाचव्या दिवशी भारताला विजय मिळवायचा असेल तर त्यांना १३५ धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. वॉशिंग्टन सुंदरला या सामन्यात ४ विकेट मिळाल्या. तर बुमराह आणि सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.
इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३८७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघही ३८७ धावांवरट आटोपला. म्हणजेच पहिल्या डावात दोन्ही संघ बरोबरीत होते. आता लॉर्ड्स कसोटीत भारताला विजयासाठी १९३ धावा करायच्या आहेत. तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडचा केवळ एक षटक खेळता आले. या षटकांत भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामी फलंदाज जॅक क्राऊली यांच्यात वादावादी झाली.
भारताच्या पहिल्या डावात केएल राहुलचे शतक
भारतीय संघाच्या पहिल्या डावात सलामीवीर केएल राहुलने शतक ठोकले. राहुलने १७७ बॉलमध्ये १०० धावा केल्या. यात १३ चौकारांचा समावेश आहे. राहुलचे कसोटी करिअरमधील हे दहावे शतक आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने ७४ धावा आणि रवींद्र जडेजाने ७२ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.