मुख्यमंत्रीपद ठरवेल हायकमांड!

शिर्डीतून डी. के. शिवकुमार यांचा थेट पलटवार


शिर्डी : मुख्यमंत्री कोण असावा याचा निर्णय योग्य वेळ आली की हायकमांड घेईल, हा विषय माध्यमांशी चर्चा करण्यासारखा नाही," अशा स्पष्ट शब्दांत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डि. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी सपत्नीक आलेल्या शिवकुमार यांनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना ही भूमिका घेतली.


?si=M5Wg2anlruTEWMNF

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी "मीच मुख्यमंत्री राहणार" असं ठणकावून सांगितलं होतं. यानंतर पक्षांतर्गत अस्वस्थतेला तोंड फुटल्याचं स्पष्ट होत असताना, शिवकुमार यांनी शिस्तीचं आणि निर्णय प्रक्रियेचं समर्थन करत अप्रत्यक्षपणे सिद्धरामय्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.


शिवकुमार म्हणाले, सध्या आमचं पूर्ण लक्ष २०२८ च्या विधानसभेच्या निवडणुकांवर आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. हायकमांडचा निर्णय आम्हाला मान्य असेल.ते पुढे म्हणाले, पक्ष नव्या पिढीला संधी देत आहे.


जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील जबाबदाऱ्या नव्या नेतृत्वाकडे सोपवल्या जात आहेत. काँग्रेस नव्यानं उभी राहत आहे, ही काळाची गरज असून, राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांचं यावर प्रभावी नेतृत्व आहे.राजकीय वक्तव्यांइतकंच, डि.के.शिवकुमार यांचा शिर्डी दौरा भावनिक रंगही घेऊन आला.


गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईदर्शन घ्यायचं ठरवलं होतं, पण गर्दीमुळे शक्य झालं नाही. आज समाधानाने दर्शन घेता आले असे उद्गार त्यांनी व्यक्त केले.डि. के.शिवकुमार आणि त्यांच्या पत्नी यांनी समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. ते दुपारी मध्यान्ह आरतीत सहभागी झाले. साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा शाल व साईमूर्ती देऊन सत्कार केला.



काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली


सिद्धरामय्या व शिवकुमार यांच्यातील ‘मुख्यमंत्रीपदाचा शीतयुद्ध’ पुन्हा एकदा उफाळून आलं आहे. जाहीरपणे कुणीही नाव घेत नाही, पण विधाने मात्र एकमेकांना उद्देशूनच केली जात आहेत. शिर्डीच्या साक्षीने दिलेलं शिवकुमार यांचं वक्तव्य काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला नव्या वळणावर घेऊन जाईल, यात शंका नाही.

Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेल रूममधल्या 'त्या' शेवटच्या क्षणांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी