मुंबईत १०६ ठिकाणी शिव आरती व शिव जल्लोष होणार

छत्रपती शिवाजी पार्कवर साजरा झाला जल्लोष


मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन मिळाल्या बद्दलचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या मुंबई भाजपातर्फे मुंबईत १०६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व शिव जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. तर आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जल्लोष करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले गड-किल्ले म्हणजे केवळ वास्तू नव्हे, तर हिंदवी स्वराज्याची शौर्यगाथा सांगणारे साक्षीदारच! अशा या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाल्याने आज महाराष्ट्राला जागतिक स्तरावर ऐतिहासिक वैभव प्राप्त झालं आहे.


या ऐतिहासिक क्षणानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुंबई भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबई भाजपा अध्यक्ष तथा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, विनम्र अभिवादन केले. ढोल ताशांचा गजरात जय शिवराय जय भवानी चा जयघोष करण्यात आला त्यामुळे संपूर्ण दादर परिसर दुमदुमून गेला होता.


शिवरायांच्या अद्वितीय नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची ही जागतिक स्तरावर झालेली ओळख, प्रत्येक शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या नागरिकासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात, महाराजांच्या जयघोषात आणि जल्लोषात संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर अगदी शिवमय झालं होतं.


याप्रसंगी केंद्रीय मंत्री पियुष गोयल , मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार संजय उपाध्याय, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, आमदार प्रविण दरेकर, आमदार कॅप्टन आर तमिल सेल्वन, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, उद्या मुंबईत १०६ ठिकाणी अशाच प्रकारे जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर