Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

  75

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय वेस्टर्न रेल्वेने घेतला आहे. रेल्वेचे तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांचे नाव, कोच क्रमांक आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात. स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी ही यादी प्रसिद्ध केली जाते. पण आता हा चार्ट आठ तास आधी जारी केला जाईल.



सेवा कधी सुरु होणार?



१४ जुलैपासून याची अंमलबजावणी केली जाईल, पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या अर्धा तास आधीच अंतिम आरक्षण चार्ट तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.





सुधारित वेळापत्रकानुसार,



सकाळी ०५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट आता आदल्या दिवशीच्या रात्री ९:०० वाजता तयार केला जाईल.


दुपारी २:०१ ते ४:० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण तक्ता त्या दिवशी सकाळी ७:३० वाजता तयार होईल.


सायंकाळी ४:०१ ते रात्री ११:५९ आणि मध्यरात्री ००:०० ते सकाळी ०५:०० या वेळेत निघणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट नियोजित प्रस्थान वेळेच्या आठ तास आधी तयार जाहीर केला जाईल.


रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दुसऱ्या आरक्षण चार्टच्या नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधीच अंतिम आरक्षण चार्ट तयार केला जाईल. प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील. हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे.

Comments
Add Comment

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून,

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात

गणपती बाप्पाचा खड्ड्यांनी भरलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास

कोकणात गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविक करतात तारेवरची कसरत मुंबई : गणेशोत्सवाची चाहूल लागली की कोकणातल्या